लॉकडाऊनमुळे बेरोजगारांना ३५०० रुपये मिळणार? जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 12:13 PM2020-05-05T12:13:56+5:302020-05-05T12:23:49+5:30

देशात लॉकडाऊन असल्यामुळे गरीब आणि कामगार वर्गाचे मोठे हाल होत आहेत. त्यात सरकारकडून देशातील गरीब नागरिकांसाठी अन्नधान्य आणि इतरही सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या कालवधीचा गैरफायदा घेतात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूकही होताना दिसून येते.

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानुसार, लॉकडाऊन असल्याने सरकारतर्फे सर्वच बेरोजगारांना ३५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे. आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हा मेसेज आला असेल तर सावधान. कारण, हा मेसेज खोटा आहे.

या मेसेजसोबत देण्यात येणाऱ्या ब्लॉगची लिंक खोटी असून कुणीही त्या ब्लॉगवर विचारण्यात आलेली माहिती भरु नये. सरकारने अशी कुठलिही योजना सुरु केली नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० अंतर्गत भारत सरकारकडून सर्वच बेरोजगार नागरिकांना ३५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत, असा दावा या फेस मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी, आपली नोंदणी करा आणि हा फॉर्म भरा, असे सांगण्यात येत आहे.

प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२० अंतर्गत भारत सरकारकडून सर्वच बेरोजगार नागरिकांना ३५०० रुपये प्रति महिना देण्यात येणार आहेत, असा दावा या फेस मेसेजमध्ये करण्यात आला आहे. त्यासाठी, आपली नोंदणी करा आणि हा फॉर्म भरा, असे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही योजना किंवा हा मेसेज बनावट आणि खोटा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेच्या रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख १५ मे असल्याचंही या मेसेजसोबत सांगण्यात येत आहे. तसेच, बेरोजगाराला १० वी पास असणे बंधनकारक असून वय वर्षे १८ ते ४० असावे, अशी अट घालण्यात आली आहे.

सध्या सोशल मीडियावर या योजनेसंदर्भात फेक न्यूज पसरविण्यात येत असून भारत सरकारने अशी कुठलीही योजना सुरु केली नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे.

पीआयबीच्या फॅक्ट चेक ट्विटर अकाऊँटवरुन आणखी एका सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामध्ये, सरकारने राष्ट्रीय सुशिक्षीत बेरोजगार योजना सुरु केली नसून रेशनकार्ड धारकास ५०, ००० रुपये देण्यात येणार असल्याचाही मेसेज खोटा आणि अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आल आहे.

दरम्यान, सध्या लॉकडाऊन असल्याने लोकांच्या, गरिबांच्या मजबुरीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होत आहे. लोकांना अमिष दाखवून त्यांची माहिती गोळी करणए, डेटा जमा करणे किंवा त्यांच्या बँक खात्यातून पैसे उकळण्याचे काम करण्यात येत आहे.

त्यामुळे, नागरिकांना जागरुक रहावे आणि कुठल्याही अमिषाला बळी न पडता सोशल मीडियावरील मसेजवर विश्वास ठेऊ नये. सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि अकाऊंटवरुनच माहितीची सत्यता तपासावी.