1 / 7अनेक साधू महंत उज्जैनमध्ये स्थान करण्यासाठी दुरून येतात. कुंभमेळ्यात स्नान केल्यास पापातून मुक्ती मिळते अशी साधूंची श्रद्धा आहे. ( फोटो : निर्माण चौधरी)2 / 7शहराच्या दक्षिण दिशेला एक मान-मंदिर वसलेले आहे. अनेक साधू-महंत या मंदिराला आवर्जून भेट देतात3 / 7क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं हे शहर अतिशय विलोभनीय असून हे शहर ‘विशाला’ ‘अवंती’ ‘अवंतिका’ अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. 4 / 7अयोध्या मथुरा हरिद्वार काशी या तीर्थक्षेत्रांसारखेच उज्जैनला हिंदू जनमानसात पवित्र तीर्थाचं स्थान आहे5 / 7उज्जैन प्राचीन काळात माळवा प्रदेशाची राजधानी होती जी आता मध्य प्रदेशाअंतर्गत येते. 6 / 7उज्जैन नगर धार्मिकदृष्ट्या अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन आहे. या नगराचा उल्लेख महाभारतात सुद्धा येतो. महाराजा विक्रमादित्य यांची हीच राजधानी होती. 7 / 7२१ एप्रिल २०१६ पासून ते २१ मे २०१६ पर्यंत देवनगरी उज्जैन येथे कुंभमेळा झाला. उज्जैनमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा होतो.