शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! पाणीपुरी खायला आवडते?, वेळीच व्हा सावध; पसरतोय 'हा' आजार, आरोग्य विभागाने केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 9:13 AM

1 / 10
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. असं असताना आता पावसाळ्यात साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.
2 / 10
पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्यात तोंडाला पाणी सुटतं. पण आता पाणीपुरी खाणं आरोग्यासाठी थोडं घातक ठरू शकतं. कारण कोरोनाच्या या संकटात पाणीपुरी आजार पसरवत असल्याचं म्हटलं जात आहे.
3 / 10
तेलंगणाच्या आरोग्य विभागाने याबाबत लोकांना अलर्ट केलं आहे आणि पाणीपुरी न खाण्याचा सल्ला दिला आहे. एक आजार पसरवण्यासाठी पाणीपुरी कारणीभूत ठरत असल्याचं तेलंगणाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
4 / 10
राज्यात टायफॉइडची प्रकरणं वाढत आहेत याचं कारण पाणीपुरी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार, राज्यातील आरोग्य अधिकारी डॉ. जी. श्रीनिवास राव यांनी टाइफॉइडला पाणीपुरी आजार म्हणू शकतो, असं म्हटलं आहे.
5 / 10
टाइफॉइडच्या वाढत्या प्रकरणाबाबत सांगताना त्यांनी रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पाणीपुरीचा उल्लेख केला. जुलै महिन्यांत टायफॉइडचे 2752 रुग्ण हे आढळून आले असल्याचं देखील सांगितलं.
6 / 10
विक्रेत्यांनीही स्वच्छतेवर लक्ष द्यावं. चांगल्या पाण्याचा उपयोग करावा. पावसाळ्यात होणाऱ्यांना आजारांसाठी दूषित अन्नपाणी आणि डास मुख्यत्वे कारणीभूत असतात. त्यामुळे टाइफॉइड आणि पावसाळ्यातील इतर आजारांपासून वाचण्यासाठी त्यांनी पाणी उकळून प्या, असा सल्ला दिला आहे.
7 / 10
रस्त्यावरील स्टॉलवर बरेच लोक पाणीपुरी खातात. आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. आता दहा रुपयांची पाणीपुरी खाण्याच्या नादात नंतर रुग्णालयात 10 हजार रुपये खर्च करावे लागतील असंही म्हटलं आहे.
8 / 10
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासोबतच टायफॉइडची साथही वाढीस लागते. टायफॉइड जंतूचे वाहक असलेल्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यपदार्थ सेवन केले अथवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे टायफॉइड होतो. या आजारात सुरुवातीला ताप येण्यास सुरुवात होते.
9 / 10
टायफॉइडच्या रुग्णाचा ताप वाढत असतो. यामुळे रुग्ण अत्यंत कमकुवत होतो. तापावरील औषधी टायफॉइडच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 95 टक्के रुग्ण खाजगी रुग्णालयात टायफॉइडवर उपचार घेऊन बरे होतात.
10 / 10
पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याचे टाळावे. पाणीपुरीचे पाणी दूषित असू शकते. स्वच्छता असलेल्या हॉटेल्स, ढाबे अशा ठिकाणी जेवण करा. जास्त त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :TelanganaतेलंगणाHealthआरोग्य