शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

स्कूल चले हम! तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधी मोजलाय का? नसेल तर एकदा बघाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 16:33 IST

1 / 10
आज शहरातील चांगल्या सीबीएसई किंवा आयसीएसई शाळेत मुलाच्या शिक्षणाचा सरासरी खर्च खूप जास्त आहे. फक्त फी नाही, तर पुस्तके, गणवेश, शूज, ट्रान्सपोर्ट इत्यादींसाठी देखील खर्च करावा लागतो. याशिवाय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त उपक्रमांचा खर्च आणि प्रवेश शुल्क वेगळे असतंच.
2 / 10
काही शाळांकडून दरवर्षी फीमध्ये वाढ देखील केली जाते. टाइम्स ऑफ इंडियाने मुलाच्या शिक्षणावरील सरासरी खर्चाची माहिती गोळा केली आहे. वेगवेगळा वर्ग, वेगवेगळी शाळा आणि वेगवेगळ्या शहरांनुसार हा खर्चाचा आकडा हा थोडा कमी किंवा जास्त असू शकतो.
3 / 10
सर्व शाळा दरवर्षी 1 ते 2 लाख रुपये ट्यूशन फी घेतात. काही शाळा 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत एडमिशन फी देखील आकारतात.
4 / 10
पालकांना शाळांमधून पुस्तके खरेदी करावी लागतात. पुस्तकावर छापलेली संपूर्ण किंमत शाळा घेते. काही राज्यांमध्ये, सरकारने शालेय पुस्तकांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. पण काही शाळा चालाखी करतात. इनहाऊस पब्लिशर्सची पुस्तकं असतात. म्हणून ते स्वत:ची म्हणून ती विकतात. त्यासाठी कॅश पेमेंटच घेतात.
5 / 10
अनेक शाळांमध्ये ब्रँडेड शूज त्यांच्या गणवेशाचा एक भाग असतात. यावरील एका जोड्याची किंमत सुमारे 2 हजार रुपये आहे. कमी किमतीच्या ब्रँडच्या शूजची किंमत 500 ते 1000 रुपये आहे.
6 / 10
शाळेचा यूनिफॉर्म साधारणपणे 2 प्रकारचा असतो - एक नॉर्मल आणि दुसरा स्पोर्ट्स. बहुतेक शाळांमध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे यूनिफॉर्म असतात. सहसा पालक मुलांना 2 यूनिफॉर्म घेतात. ज्याची किंमत 3,000 ते 7,000 रुपये असते.
7 / 10
स्कूल बसचे भाडे वेगवेगळ्या शाळा, घरापासूनचे अंतर आणि बसच्या प्रकारानुसार बदलते. बस ओनर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, जर विद्यार्थी कॅम्पसपासून 2 किलोमीटरपेक्षा कमी परिसरात राहत असेल तर त्याचे भाडे 28 हजार ते 30 हजार रुपये वार्षिक असेल.
8 / 10
शाळा दूर असल्यास अंतरानुसार फी आकारली जाते. पहिल्या पाच किलोमीटरसाठी 32,000 ते 35,000 रुपये मोजावे लागतील. 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहतुकीसाठी 35 ते 60 हजार रुपये खर्च येईल.
9 / 10
काही शाळा अभ्यासा व्यतिरिक्त इतरही अनेक उपक्रम घेत असते. पिकनिक, एन्युएल डे, स्पोर्ट्स डे इत्यादींसाठी अतिरिक्त शुल्क आकारतात.
10 / 10
अशाप्रकारे एका मुलाच्या शिक्षणावर वर्षाला सरासरी दोन ते तीन लाख रुपये खर्च होतात. जर एखाद्या पालकाला दोन मुले असतील तर हा खर्च 4 ते 6 लाख रुपयांपर्यंत येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थी