1 / 9भारताने जेव्हा पाकिस्तानवर हल्ला केला होता, तेव्हा तुर्कीने पाकिस्तानची मदत केली होती. पाकिस्तानला शस्त्रे पुरविली होती. तुर्कीच्या हवाई दलाची दोन मालवाहू विमाने पाकिस्तानात उतरली होती. त्यातून घातकी ड्रोन पाकिस्तानला देण्यात आले होते. सोबत तुर्कीने हे ड्रोन चालविणारे लोकही पुरविले होते. भारताच्या प्रत्यूत्तरात तुर्कीचे शेकडो ड्रोन तर पाडले होतेच पण तुर्कीने पुरविलेल्यांपैकी एक ड्रोन चालकही मारला गेला होता. 2 / 9ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने जेव्हा पाकिस्तानला मदत केल्याचे भारतीयांना समजले तेव्हा तुर्की आणि अझरबैजान या देशांना भेट देण्याविरोधात मोहिम सुरु झाली. तुर्कीला जे लोक पर्यटनासाठी जाणार होते, त्यांनी लाखोंच्या संख्येने बुकिंग रद्द केली. तुर्कीवर बहिष्कार टाकण्यात आला. यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. 3 / 9अशातच भारताने तुर्कीलाच आपल्या टाचेखाली ठेवण्यासाठी चाल खेळली आहे. ज्या ब्रम्होस मिसाईलनी पाकिस्तानात कहर माजविला होता, तीच घातक मिसाईल भारत तुर्कीचा दुश्मन देश सायप्रसला देण्याची ऑफर भारताने ठेवली आहे. 4 / 9तुर्कीच्या मीडियामध्ये भारत बदला घेत असल्याचे छापून येत आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने पाकिस्तानला थेट मदत केली होती, त्याचा बदला आता भारत घेत असल्याचे तुर्कीच्या मीडियात म्हटले जात आहे. 5 / 9तुर्कीच्या बाजुलाच समुद्रातील बेटांवर हा सायप्रस देश आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार अर्दान जेंटुर्क यांच्यानुसार या प्रदेशातील तुर्कीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भारताने सायप्रसला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देण्याचा निर्णय घेतला आहे. 6 / 9सायप्रस, ग्रीस आणि आर्मेनिया सारखे देश तुर्कीच्या विस्तारवादी वागण्यामुळे त्रस्त आहेत. यापैकी ग्रीस सोबतची ब्रम्होसची बोलणी फिस्कटली आहेत. ग्रीसने भारताची ब्रम्होस डील अर्धवट सोडली आहे. ते इटलीची एअर डिफेन्स सिस्टीमसाठी पुढे चालले आहेत. 7 / 9गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायप्रसच्या दौऱ्यावर गेले होते. २००२ नंतर हा भारतीय पंतप्रधानांचा दौरा होता. याद्वारे तुर्कीलाच संदेश द्यायचा होता. तो यशस्वी करण्यासाठी सायप्रसला ब्रम्होस घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 8 / 9यामुळे तुर्कीत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. भारताची ब्रम्होस आपल्या दुश्मन देशाकडे जाणे म्हणजे तुर्कीला धोका असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तुर्कीकडे रशियाची एस-४०० एअर डिफेंस सिस्टीम आहे, परंतू ती अद्याप तुर्कीने अॅक्टीव्हेट केलेली नाही. 9 / 9अमेरिकेच्या लढाऊ विमानांची डील तुर्कीला करायची आहे. यामुळे अमेरिकेची लढाऊ विमाने मिळविण्यासाठी तुर्कीने एस-४०० अद्याप तैनात केलेली नाहीय. तुर्कीने १९७४ पासून सायप्रसची बेटे आपल्या ताब्यात ठेवली आहेत. मोदींनी या बेटांचाही दौरा केला होता. ब्रम्होस जर या देशाकडे आली तर ते तुर्कीला टक्कर देऊ शकणार आहेत.