डोनाल्ड ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर मरीन वन दाखल, मिसाईलला सुद्धा देऊ शकते टक्कर !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 05:47 PM2020-02-20T17:47:05+5:302020-02-20T22:28:53+5:30

जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यात ते अहमदाबादला भेट देणार आहेत. यासाठी अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षतेच्यादृष्टीने अहमदाबाद विमानतळावर उपाययोजना केल्या आहे. तसेच, अमेरिकेचे वायू सेनेचे ग्लोबमास्टर विमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यक्तीगत हेलिकॉप्टर मरीन-वन सुद्धा अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले आहे.

ग्लोबमास्टरमधून अमेरिकी स्नायपर डॉग, फायर सेफ्टी सिस्टम, स्पाय कॅमेरा, मरीन कमांडो यांच्याशी निगडीत सुरक्षा सामग्री आणली आहे.

याशिवाय, मरीन वनमध्ये उपयुक्त सैन्य अॅन्टी मिसाईल प्रणाली बसविण्यात आलेली असते. असे सांगण्यात येत आहे की, या हेलिकॉप्टरवर तोफांचा मारा केल्यानंतरही नुकसान होत नाही. मिसाइल सुद्धा याला भेदून जाऊ शकत नाही.

हे हेलिकॉप्टर व्हीएच-थ्री कॅटगरीचे हेलिकॉप्टर आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने चांगले असल्याचे म्हटले जाते.

याआधी अमेरिकेच्या वायू सेनेचे हार्क्युलस विमान डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यातील गाड्यांसोबत अहमदाबादमध्ये पोहोचले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यातील रोडरनर कारची सध्या जास्त चर्चा सुरु आहे. ही कार केवळ बुलेटप्रूफच नाही तर भूसुरुंग विरोधी, मिसाईल, रासायनिक हल्ला परतवून लावणारी आहे. तसेच, कारची बॉडी ही स्टील, टायटॅनिअम, अॅल्युमिनिअम आणि सिरॅमिकच्या मिश्रणातून बनविण्यात आलेले आहे. यामुळे रासायनिक, गॅस आणि आगीसारख्या हल्ल्यापासून कारचा बचाव होतो.