पाकिस्तानच्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 15:01 IST2018-06-03T15:01:22+5:302018-06-03T15:01:22+5:30

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सीमेवरील गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
रात्री 2.30 वाजल्यापासून पाकिस्तानने गोळीबारास सुरुवात केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
पाकिस्तानच्या गोळीबारात विजयकुमार पांडेय आणि सत्यनारायण यादव या जवानांना वीरमरण आले.
नियंत्रण रेषेपलिकडील पाकिस्तानी चौक्यांवरून सातत्याने गोळीबार करण्यात येत आहे.