शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ओसाड जमीन खोदताना भांडे खणखणले; तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने पाहून डोळे विस्फारले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 6:11 PM

1 / 10
तेलंगानाच्या जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थीमध्ये एका शेतकऱ्याला घबाड सापडले आहेत. (A farmer from Pembarthi in Jangaon district from Telangana discovered a pot filled with gold on Thursday.)
2 / 10
गुरुवारी एका ओसाड जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरु असताना मातीतून सोन्याचे दागिने पडू लागल्याचा प्रकार घडला.
3 / 10
शेतकरी नरसिंह याला जवळपास 5 किलो सोन्याचे करोडोंमध्ये किंमत असलेले ऐतिहासिक दागिने सापडले आहेत.
4 / 10
याची सोन्याच्या भावाप्रमाणे किंमत 2 कोटी आहे. परंतू अँटीक वस्तूंच्या बाजारात याची किंमत न सांगता येण्यासारखी आहे.
5 / 10
नरसिंह याला सोन्याचा घडा मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा घडा पाहण्यासाठी शेकडो लोकांची जंगलात गर्दी झाली.
6 / 10
याची माहिती प्रशासनाला मिळताच पोलिसांसह महसूलचे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी हे सोने ताब्यात घेऊन निरिक्षणासाठी पाठविले आहे.
7 / 10
नरसिंह यांने एक महिन्यापूर्वीच ही 11 एकर जमीन खरेदी केली होती. ती जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी लेव्हलिंगचे काम सुरु होते.
8 / 10
हा खजिना काकतीय साम्राज्याच्या वेळच असल्याचे सांगितले जात आहे.
9 / 10
काकतीय साम्राज्याची राजधानी वारंगल होती. जनगाव आधी वारंगलचा भाग होते. काही वर्षांपूर्वीच आता वेगळा जिल्हा बनविण्यात आला आहे.
10 / 10
आता हा खजिना ऐतिहासिक निघाला तर नरसिंह या शेतकऱ्याला त्याच्या एकूण किंमतीचा काही भाग बक्षीस म्हणून मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा जमीन खरेदीचा खर्च वसूल होणार आहे.
टॅग्स :GoldसोनंFarmerशेतकरी