शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:00 IST

1 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेन भारतीय प्रवाशांच्या सेवेत येण्यास सज्ज झाली आहे. दोन प्रोटोटाइप रेक, अनेक महिन्यांची ट्रायल, या दरम्यान आलेल्या अडचणी, निरीक्षणांनंतर केलेले महत्त्वाचे बदल असे अनेक टप्पे पार करत अखेरीस वंदे भारत ट्रेन स्लीपर व्हर्जन भारतीय रुळांवर धावताना दिसणार आहे.
2 / 15
काही दिवसांपूर्वी स्लीपर वंदे भारत ट्रेन प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत कधी येईल, याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली होती. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा पहिला मार्ग, संपूर्ण वातानुकूलित ट्रेनच्या ३ टियर, २ टियर आणि प्रथम दर्जाच्या कोचचे भाडे, याबाबतही माहिती देण्यात आली.
3 / 15
१७ जानेवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वी तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. स्लीपर वंदे भारत ट्रेनसह पंतप्रधान मोदी सहा अमृत भारत ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
4 / 15
चेअर कार वंदे भारत ट्रेनच्या अभूतपूर्व यशानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात सामान्य प्रवाशांसाठी आतापर्यंत देण्यात आल्या नाहीत, अशा अनेक सोयी, सुविधा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये पाहायला, अनुभवायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
5 / 15
देशातील पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या आतील भागाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्राइव्हेट कपल कूपची सुविधा देण्यात आली आहे. तसेच फर्स्ट एसी कोचमध्ये शॉवर सुविधाही देण्यात आली आहे. केशरी आणि राखाडी रंगाची स्लीपर वंदे भारत सुरुवातीला हावडा आणि गुवाहाटी दरम्यान धावेल. सरकारने आधीच सांगितले आहे की, गुवाहाटी ते कोलकाता या ट्रेनचे भाडे विमान तिकिटापेक्षा खूपच कमी असेल.
6 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावण्यास सक्षम आहे. तशी चाचणीही यशस्वी झाली आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये प्रगत सुरक्षा प्रणाली, सुधारित सस्पेंशन, एनर्जी एफिशिएंट आणि अधिक एरोडायनामिक डिझाइन आहे. आरामदायी आणि विश्वासार्ह लांब पल्ल्याच्या प्रवासाची खात्री करण्यासाठी प्रवाशांच्या सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
7 / 15
वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देईल, विशेषतः लांब रात्रीच्या प्रवासासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन विशेष ठरणारी आहे. ही ट्रेन प्रादेशिक आदरातिथ्याचा विचार करेल. एखाद्या विमानासारख्या सेवा या स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
8 / 15
डिझाइन केलेल्या बर्थमध्ये लांब प्रवास कमी थकवणारा असेल. स्वयंचलित दरवाजे आणि वेस्टिब्युल्स (कनेक्ट केलेले कॉरिडॉर) डब्यांमधील हालचाल सुलभ करतात, ज्यामुळे प्रवास करतानाही प्रवाशांना सहज दोन कोचमधून ये-जा करता येणे शक्य होते. कवच अँटी-कलिजन सिस्टम आणि आपत्कालीन टॉक-बॅक सिस्टम आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहज मदत प्रदान करतात.
9 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये अत्याधुनिक सस्पेंशन सिस्टम आहे, ज्यामुळे आवाज लक्षणीयरीत्या कमी होऊन शांत आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित होतो. जंतुनाशक तंत्रज्ञानामुळे डबे नेहमीच स्वच्छ आणि जंतूमुक्त असतात, याची खात्री होते. आधुनिक नियंत्रण पॅनेल आणि सुरक्षा प्रणालींसह लोको पायलटसाठी अतिशय अत्याधुनिक आणि प्रगत केबिन डिझाइन करण्यात आली आहे.
10 / 15
एरोडायनामिक डिझाइनमुळे ट्रेन उच्च वेगाने स्थिर राहते. स्वयंचलित दरवाजे असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता कायम राहते. पुढील सहा महिन्यांत आणखी ८ वंदे भारत स्लीपर ट्रेन येतील, तर वर्षभरात एकूण १२ ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. इतर ट्रेन तुलनेत अनेक प्रगत आणि अद्वितीय वैशिष्ट्यांसह वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
11 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी ‘कवच’ प्रणाली, बायो-वॅक्यूम टॉयलेट्स, नाईट-लायटिंग, सीसीटीव्ही, ऑटो-डोअर्स सुविधा ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत. तसेच अपंग प्रवाशांसाठी विशेष टॉयलेट, बेबी केअर एरिया, शॉवर सुविधा (फर्स्ट क्लासमध्ये गरम पाण्यासह), पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, प्रत्येक कोचमध्ये वाचन दिवे, चार्जिंग पॉइंट्स, फोल्डेबल स्नॅक टेबल्स, जीएपआरपी इंटिरिअर पॅनल्स बसवले आहेत.
12 / 15
भारतीय रेल्वे २०० हून अधिक वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा रोडमॅप तयार करत आहे. वंदे भारत स्लीपर ही एक सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे ज्यामध्ये एकूण १६ कोच आहेत, ज्यामध्ये ११ थर्ड एसी, ४ सेकंड एसी आणि १ फर्स्ट एसी कोच आहे. थर्ड एसीमध्ये ६११ बर्थ, १८८ सेकंड एसी आणि २४ फर्स्ट एसी बर्थ आहेत.
13 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेन ट्रेन एकूण ८२३ प्रवाशांना घेऊन जाईल. तिचा वेग ताशी १८० किलोमीटरपर्यंत आहे. आता पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचा मार्ग, तिकीट दर या सगळ्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेची देशातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणार आहे.
14 / 15
स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर समोर आले आहेत. 3rd AC श्रेणीचे दर जेवणासह सुमारे ₹२,३०० असेल. 2nd AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,००० आणि 1st AC श्रेणीचे दर सुमारे ₹३,६०० असण्याची अपेक्षा आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दर विमानाच्या दरांपेक्षा खूपच कमी ठेवण्यात आले आहे. गुवाहाटी ते हावडा विमान भाडे ₹६,००० ते ₹८,००० दरम्यान आहे. वंदे भारतमध्ये जेवणासह थर्ड एसीचे दर सुमारे ₹२,३००, सेकंड एसीचे सुमारे ₹३,००० आणि फर्स्ट एसीचे सुमारे ₹३,६०० असेल. हे दर सामान्य माणसाला लक्षात घेऊन निश्चित करण्यात आले आहे.
15 / 15
बहुप्रतिक्षित 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन लवकरच धावणार असून, या ट्रेनच्या एका कोचची (डब्याची) किंमत समोर आली आहे. या सेमी-हाय-स्पीड स्लीपर ट्रेनची निर्मिती मेट्रो कोचच्या तुलनेत स्वस्त दरात करण्यात आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एका कोचची किंमत सुमारे ८ ते ८.५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मेट्रो रेल्वेच्या एका कोचची किंमत १० ते १०.५ कोटींच्या घरात असते. म्हणजेच मेट्रोच्या तुलनेत ही ट्रेन रेल्वेसाठी किफायतशीर ठरत आहे.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनwest bengalपश्चिम बंगालAssamआसामAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवCentral Governmentकेंद्र सरकार