शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

School Reopen : १५ ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये सुरू होणार, कडक नियम लागू असणार

By ravalnath.patil | Published: October 02, 2020 6:50 PM

1 / 10
केंद्रीय गृह मंत्रालयाने पाचव्या टप्प्यात 5.0 अनलॉक प्रक्रियेसंदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह विविध राज्यांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. सरकारने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना केली आहेत.
2 / 10
या मार्गदर्शक तत्त्वानुसार असे म्हटले आहे की, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे. याशिवाय, शाळा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवतील.
3 / 10
एवढेच नाही तर केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल. तसेच, राज्य सरकार कोरोना संसर्गाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेईल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसणार आहे.
4 / 10
याचबरोबर, असे म्हटले आहे की, जर मुले शाळेत आली नाहीत आणि त्यांचे पालक ऑनलाइन वर्गांसाठी तयार असतील तर शाळा लेखी परवानगीशिवाय मुलांना येण्यास सांगणार नाही. यामध्ये उपस्थितीसंदर्भात मुलांना कोणताही दबाव आणला जाणार नाही.
5 / 10
शाळा-महाविद्यालये किंवा शैक्षणिक संस्था सुरू करताना राज्य सरकार आणि प्रशासनाने तयार केलेल्या एसओपीचे पालन करणे बंधनकारक असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
6 / 10
राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था 15 ऑक्टोबरपासून विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पीएचडी आणि पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा / प्रायोगिक कामांसाठी उघडतील.
7 / 10
उत्तर प्रदेश सरकारने 15 ऑक्टोबरपासून सर्व शैक्षणिक संस्था उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्य सरकार यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करत आहे. याशिवाय 28 सप्टेंबरपासून बिहारमध्ये 9 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 15 ऑक्टोबरपासून शैक्षणिक संस्था बिहारमध्ये सुरू करण्यास सांगितले आहे.
8 / 10
दिल्ली-एनसीआरमध्ये केजरीवाल सरकारने 5 ऑक्टोबरपर्यंत सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता 15 ऑक्टोबरपासून शाळा-महाविद्यालये निश्चित मार्गदर्शक सूचना घेऊन उघडता येतील का, याबाबत सरकार 5 ऑक्टोबरनंतर निर्णय घेणार आहे.
9 / 10
गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वेक्षणात देशातील 71टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि येणाऱ्या उत्सवाच्या काळात सध्या पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.
10 / 10
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ८१ हजार ४८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात एकूण ६३ लाख ९४ हजार ०६९ कोरोनाग्रस्त आहेत. गेल्या २४ तासांत १ हजार ९५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ९९ हजार ७७३ जणांचा बळी गेला आहे.
टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या