शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोशल मीडियावर फाटलेल्या जीन्ससोबत महिलांचे फोटो; तीरथ सिंह रावतांच्या विधानाचा करतायेत निषेध!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 1:11 PM

1 / 9
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे सध्या आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत फाटलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
2 / 9
महिला नेत्यांनी या विधानावरून तीरथ सिंह रावत यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र सोडले आहे. तर महिला नेत्यांसह बऱ्याच महिलांनी सोशल मीडियावर फाटलेल्या जीन्ससह त्यांचे फोटो शेअर करण्यास सुरुवात केली आहे.
3 / 9
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे. महिला छोटे कपडे घालतात म्हणून बलात्कार होत नाहीत, तर तीरथ सिंह रावत यांच्यासारखे लोक आपले कर्तव्य बजावत नसल्यामुळे होतात, असे स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात सोशल मीडियावर चालणार्‍या #RidedJeansTwitter हा हॅशटॅगला समर्थन दिले आहे.
4 / 9
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथ सिंग रावत यांच्या या विधानावर टिप्पणी केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, 'देशातील संस्कृती आणि संस्कारावर त्या पुरुषांना फरक पडतो, जो महिलांना आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, तेव्हाच देश बदलेल.'
5 / 9
रोहिणी सिंग यांनी जीन्स घालून आपला फोटो शेअर करत या हॅशटॅगला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये #RippedJeansTwitter सुद्धा लिहिले असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.
6 / 9
मणिपूरमध्ये राहणारी 9 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती लिकाप्रिया कंगुजम हिनेही उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना लक्ष्य केले. यासह लिकप्रिया कंगुजमनेही आपला जीन्स घातलेला फोटो शेअर केला आहे.
7 / 9
अभिनेत्री भूमिका हिनेही फाटलेल्या जीन्ससोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर केला आहेत. तसेच, लिहिले आहे की, 'फाटलेली जीन्स फाटलेल्या मेंदूपेक्षा चांगली आहे.'
8 / 9
या व्यतिरिक्त बऱ्याच महिला #RippedJeansTwitter या हॅशटॅगला समर्थन देत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत आहेत. दुसरीकडे, राजकीय पक्षांपासून ते सोशल मीडिया युजर्सपर्यंत सर्व स्तरावर तीरथ सिंह रावत यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यसभा खासदार जया बच्चन, टीएमसीचे खासदार महुआ मोईत्रा यांनीही तिरथसिंग रावत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.
9 / 9
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. 'आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,' असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले होते. यावरून विरोधी पक्षांनी निशाणा साधत तीरथ सिंह रावत यांनी महिलांची माफी मागावी, असे म्हटले आहे.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणBJPभाजपा