अहमदाबादेतल्या 'या' प्रसिद्ध मंदिराची सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 11:38 PM2020-02-25T23:38:29+5:302020-02-25T23:43:30+5:30

अहमदाबादेतल्या गांधीनगर भागातले अक्षरधाम मंदिर गुजरातमधल्या प्रमुख सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. 1992मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती.

हे मंदिर भगवान स्वामिनारायणाला समर्पित आहे. इथे त्यांची सोन्याची जवळपास 7 फूट उंच मूर्ती आहे.

या मंदिराच्या भिंतींवर गुलाबी रंगांचे दगड लावलेले असून, वीज पडल्यानंतर त्या भिंती चमकतात.

या मंदिराला हिरव्यागर्द झाडांनी सुशोभित करण्यात आलं आहे. अक्षरधाम मंदिरात वास्तुकला, शिक्षा असे विविध पैलू एकत्र पाहायला मिळतात.

मंदिराजवळील चंदोला तलाव हे ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. दिसायला खूप सुंदर असलेल्या तलावाचं निर्माण मुगल सुलतान अहमदाबाद ताज खान नारी अलीच्या पत्नीच्या सांगण्यावरून केलं होतं.

तसेच साबरमती नदीच्या किनारी साबरमती आश्रमही आहे. साबरमती आश्रम हे ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे.

महात्मा गांधींनी याची स्थापना 1915मध्ये केली होती.

या आश्रमाकडे संग्रहालय, पुस्तकालय, ऐतिहासिक सभागृहाच्या स्वरूपात पाहिलं जातं.

अहमबादाबादचे संस्थापक सुलतान अहमद शाह यांच्या नावानं इथे प्राचीन मशीदही आहे. शहरातील ही सर्वात जुनी मशीद असून, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

इसवी सन 1414 मध्ये स्थापन केलेल्या मशिदीला काळे आणि पांढऱ्या संगमरवरी दगडानं झळाळी देण्यात आली आहे.