राहुल गांधींनी साधला बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 00:02 IST2018-01-08T23:57:27+5:302018-01-09T00:02:13+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बहरीनमधील भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला.

ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल्स ऑफ इंडियन ओरिजनच्या संमेलनाला राहुल गांधी यांनी संबोधित केले.

यावेळी तुमची बुद्धिमत्ता, कौशल्य, सहनशीलता आणि देशप्रेमाची देशाला गरज असल्याचे राहुल गांधींनी उपस्थितांना सांगितले. तसेच देशातील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.

त्याआधी राहुल गांधी यांनी आज दुपारी बहरीनचे शेख सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली.

राहुल गांधी यांच्या संबोधनावेळी उपस्थित असलेला जनसमुदाय.