शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rahul Gandhi Priyanka Gandhi: राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही? प्रियांका गांधींनी Bharat Jodo Yatra मध्ये दिलं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 3:53 PM

1 / 9
Rahul Gandhi Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. १०० दिवसांपासून अधिक दिवस ही यात्रा देशभरात सुरू आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
2 / 9
या यात्रेला केवळ लोकांचा आणि राजकीय नेतेमंडळींचाच नव्हे तर अनेक सेलिब्रिटी आणि नामवंत व्यक्तिंचाही प्रतिसाद मिळताना दिसत आहे. भारत जोडो यात्रा दिल्लीच्या गाजियाबाद मधून उत्तर प्रदेशात दाखल झाली.
3 / 9
काँग्रेसच्या महासचिव आणि राहुल यांची बहिण प्रियांका गांधी यांनी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, राहुल गांधी इतक्या थंडीत केवळ टी-शर्ट घालून दौरा करताना दिसतात. त्यांना थंडी का वाजत नाही? याचेही प्रियांका यांनी उत्तर दिले.
4 / 9
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या टी-शर्टची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले. लोनी बॉर्डरवर राहुल यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यासाठी प्रियांका गांधी हजर होत्या.
5 / 9
5.प्रियांका यांनी यात्रेचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांनी भाषणादरम्यान एक अतिशय चर्चेत असलेल्या मुद्द्यावर भाष्य केले. राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? असा प्रश्न अनेकांना पडल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले होते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. याचे त्यांनी भन्नाट उत्तर दिले.
6 / 9
राहुल गांधी यांचा प्रियांका गांधींना अतिशय गर्व वाटतो असं त्या म्हणाल्या. 'माझ्या भावाविरोधात अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला. त्याच्यामागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावण्यात आला. तो डगमगला नाही. अंबानी, अदानी सारख्या उद्योगपतींनी अनेक गोष्टी विकत घेतल्या, पण माझ्या भावाला ते विकत घेऊ शकले नाहीत,' असं प्रियांका म्हणाल्या.
7 / 9
'माझा भाऊ हा एक उत्तम फायटर म्हणजेच झुंजार वृत्तीचा माणूस आहे. गेल्या शंभरहून जास्त दिवसात माझ्या भावाने सुमारे ३ हजारांपेक्षा जास्तीचं अंतर पार केलं आहे. याबद्दल एक बहिण मला माझ्या भावाचा अभिमान वाटतो,' असं प्रियांका यांनी ठणकावून सांगितले.
8 / 9
प्रियांका गांधी यांनी भाषणात देशात वाढत असलेली थंडी आणि राहुल गांधी यांनी घातलेल्या टी-शर्टचा उल्लेख आवर्जून केला. त्या म्हणाल्या- मला अनेक लोक विचारत असतात, 'तुमच्या भावाला थंडी वाजत नाही का? तो इतक्या थंडीमध्येही फक्त टी-शर्ट घालून कसा काय भारत जोडो यात्रा पूर्ण करत आहेत?'
9 / 9
प्रियांका गांधी यांनी याबद्दल उत्तरदेखील दिले. त्या म्हणाल्या- 'मला जेव्हा असे प्रश्न विचारले जातात, तेव्हा मला माझ्या भावाचा गर्व वाटतो. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, माझ्या भावाला थंडी वाजत नाही कारण त्याने सत्याचे कवच स्वत:भोवती घातले आहे आणि म्हणूनच त्याला देवसुद्धा कायम सुरक्षित ठेवेल, कोणताही त्रास होऊ देणार नाही.'
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राdelhiदिल्लीcongressकाँग्रेस