शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधींना ओळख लपवून शिक्षण घ्यावे लागले, तीन वर्षे नोकरीही केलेली, किती डिग्री घेतल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 11:56 AM

1 / 10
राहुल गांधींना अनेकवेळा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. शिक्षणासाठी त्यांना आपले नावही बदलावे लागले होते.
2 / 10
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पूत्र राहुल गांधी एका राजकीय कुटुंबात वाढले. या एकमेव कारणामुळे त्यांना एकाच ठिकाणी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही.
3 / 10
राहुल गांधींना अनेकवेळा आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले, असे सांगितले जाते. राहुल यांनी आपले प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कूलमधून केले. परंतु लवकरच त्यांना दुसरीकडे जावे लागले.
4 / 10
यानंतर राहुल गांधी डेहराडूनच्या 'दून स्कूल'मध्ये शिक्षणासाठी गेले. राजीव गांधी देखील या शाळेचे विद्यार्थी होते.
5 / 10
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना डेहरादून सोडून घरूनच शिक्षण घ्यावे लागले.
6 / 10
1989 मध्ये राहुल गांधींनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इथलेही शिक्षण सोडून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले.
7 / 10
हार्वर्ड मधील शिक्षणानंतर त्यांनी 1991 ते 1994 या काळात रोलिन्स कॉलेजमध्ये कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. परंतू नाव बदलून.
8 / 10
राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून एम.फिल पदवी प्राप्त केली आहे.
9 / 10
राहुल गांधींनी नोकरीही केली. लंडनच्या मॉनिटर ग्रुपमध्ये 3 वर्षे काम केले. राऊल विंसी या नावाने ते वावरत होते.
10 / 10
ही कंपनी मॅनेजमेंट गुरू मायकेल पोर्टर यांची कन्सल्टन्सी फर्म होती. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी परदेशात आणि नोकरीकाळात नाव बदलून वावरावे लागले होते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस