Pulwama Attack: शहीद जवानांना देशभरातून आदरांजली, अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 15:01 IST2019-02-16T14:50:18+5:302019-02-16T15:01:09+5:30

पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री राजधानी दिल्लीत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही शुक्रवारी रात्री नवी दिल्लीमध्ये शहीद जवानांना आदरांजली वाहत अभिवादन केले.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिल्लीमध्ये शहीद जवानांना अभिवादन केले.
पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना अभिवादन करताना मुख्यमंत्री नितीश कुमार
सीआरपीएफ जवान रमेश यादव यांना ग्रामस्थांनी तिरंग्याच्या छायेत अखेरचा निरोप दिला.
राजस्थानमधील सीआरपीएफ जवान रोहितास लांबा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला जनसमूदाय
सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना अभिवादन करतान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत
सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना त्यांच्या मुलीने सॅल्युट ठोकून अभिवादन केल्यावर उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.
महाराष्ट्रातील मलकापूर येथे शहीद जवान संजय राजपूत यांच्या अंत्ययात्रेला लोटलेला जनसमुदाय