पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मस्थळमधील मंजुनाथ मंदिराचं घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 16:02 IST2017-10-29T15:57:01+5:302017-10-29T16:02:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकाच्या एक दिवसाच्या दौ-यावर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मस्थळ मंजुनाथ मंदिराचं दर्शन घेतलं आहे.
उजीरला भेट देऊन मंजुनाथ मंदिरात त्यांनी पूजाअर्चाही केली आहे.
धर्मस्थळ उजीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडिया व कॅशलेस व्यवहारांवरही भाष्य केलं आहे. धर्मस्थळमध्ये नरेंद्र मोदींनी तीन सभा घेणार आहेत.
उजीरमध्ये ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या लाभार्थ्यांना रूपे कार्डही वितरीत केली आहेत.