शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

PMO Seva Teerth: ११८९ कोटींचा खर्च, एकाच छताखाली सर्व मंत्रालये; कसे आहे PM मोदींचे नवे ऑफिस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:59 IST

1 / 8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या कार्यालयाचा पत्ता आता सेवा तीर्थ असणार आहे. मोदींच्या हस्ते सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनचे उद्घाटन करणार आहेत. सेवा तीर्थ परिसर दारा शिकोह रोडवर आहे. तब्बल २.२६ लाख चौरस फूट क्षेत्रावर सेवा तीर्थ उभारण्यात आले आहे.
2 / 8
सेवा तीर्थ उभारण्यासाठी तब्बल ११८९ कोटी रुपये खर्च आला आहे. नव्या सेवा तीर्थमध्ये पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद मुख्यालय आणि मंत्रालयांची कार्यालये आहेत. हे सर्व पूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी होते.
3 / 8
सेवा तीर्थमधील सर्व कार्यालय स्मार्ट आणि अत्याधुनिक सुविधांसह तयार करण्यात आली आहेत. वेगवान इंटरनेट, पेपरलेस कार्य संस्कृतीसाठी डिजिटल अर्काईव्हज्, अत्याधुनिक कॉन्फरन्स रुम आदींचा यात तयार करण्यात आलेले आहेत.
4 / 8
सेवा तीर्थ परिसरात ती मुख्य इमारती आहेत. सेवा तीर्थ -१ मध्ये पंतप्रधान कार्यालय आहे. सेवी तीर्थ -२ मध्ये मंत्रालयांची कार्यालये आहेत. सेवा तीर्थ -३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे कार्यालय आहे.
5 / 8
पूर्वी पंतप्रधान कार्यालय आणि मंत्रालयांची कार्यालये असलेले साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. त्यांचा वापर आता संग्रहालयासाठी करण्यात येणार आहे.
6 / 8
कर्तव्य भवन १ आणि २ मध्ये कायदा, संरक्षण, अर्थ, आरोग्य, कृषि आणि इतर काही महत्त्वाच्या मंत्रालयाची कार्यालये आहेत.
7 / 8
४ स्टार जीआरआयएचए अर्थात ग्रीन रेटिंग फॉर इंटीग्रेटेड हॅबिटेट असेसमेंटच्या मानकांनुसार सेवा तीर्थमधील इमारतींची उभारणी करण्यात आली आहे. यात अत्याधुनिक ऊर्जा प्रणाली, पाण्याच्या बचतीसंदर्भातील उपाय आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला गेलेला आहे.
8 / 8
या भवनामध्ये स्मार्ट अॅक्सेस कंट्रोल सिस्टिम, मॉनिटरिंग नेटवर्क आणि अॅडव्हॉन्स्ड एनर्जी रिस्पॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांचाही समावेश आहे. ज्यामुळे अधिकारी आणि लोकांना ये-जा करणे अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे.
टॅग्स :prime ministerपंतप्रधानNew Delhiनवी दिल्ली