पंतप्रधान मोदींची एरियल फोटोग्राफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:49 IST2018-09-24T15:42:41+5:302018-09-24T15:49:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं उद्धाटन केलं. सिक्किमला जाताना मोदींनी एरियल फोटोग्राफीचा आनंद लुटला. हे फोटो मोदींनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या सिक्किमचे सुंदर फोटो मोदींनी ट्विट केले. सिक्कीमचं निसर्ग सौंदर्य मोहक आणि अविश्वसनीय असल्याचं मोदींनी म्हटलं.
एमआय-8 हेलिकॉप्टरनं सिक्कीमला निघालेल्या मोदींना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
पंतप्रधान मोदींनी काढलेले फोटो सध्या ट्विटरवर कौतुकाचा विषय ठरले आहेत.
सिक्किममध्ये आज मोदींनी पाकयोंग विमानतळाचं लोकार्पण केलं.
पाकयोंग विमानतळ समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूट उंचीवर आहे.
2009 मध्ये या विमानतळाचं कामकाज सुरू झालं. या विमानतळाचं काम पूर्ण व्हायला 9 वर्षांचा कालावधी लागला.
सिक्किमवासीयांचं विमानतळाचं स्वप्न आज साकार झालं आहे.