By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:22 IST
1 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील दिब्रुगड येथे भारतीय हवाई दलाच्या पहिल्या हायवे इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी (ELF) वापर करत भारतीय हवाई दलाच्या C130 Super Herculers लँडिंग केले. ही सुविधा अप्पर आसाममधील एका हायवे स्ट्रिपवर बनवण्यात आली आहे. 2 / 10याचा वापर युद्ध किंवा आपत्कालीन परिस्थितीत केला जाऊ शकतो. याठिकाणी लढाऊ विमाने, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट यासह हेलिकॉप्टरसाठी पर्यायी लँडिंग सुविधा उभारण्यात आली आहे. हे पूर्वोत्तर भारतातील संरक्षण आणि रणनीतीदृष्टीने तयार केलेले महत्त्वाचे पाऊल आहे.3 / 10ELF म्हणजे काय आणि ते दिब्रुगडमध्ये का बनवले? - आपत्कालीन लँडिंग सुविधा ही एक अशी हायवे स्ट्रिप आहे जी सामान्यतः तिथे वाहने धावत असतात परंतु आवश्यकतेनुसार ती धावपट्टीमध्ये रूपांतरित केली जाऊ शकते. त्याठिकाणी विमान उड्डाण आणि लँडिंग केले जाऊ शकते. दिब्रुगड हे आसामच्या वरच्या बाजूस आहे जे भारत आणि चीन सीमेपासून खूप जवळ आहे.4 / 10यामुळे भारतीय हवाई दलाच्या (IAF) मुख्य हवाई तळावर हल्ला झाल्यास किंवा त्याचे नुकसान झाल्यास ही एक पर्यायी जागा उपलब्ध होईल. यावर विमाने तैनात करता येतील, ज्यामुळे शत्रूच्या लक्ष्यांना लक्ष्य करणे अधिक कठीण होईल. त्याशिवाय पूर्वेकडील क्षेत्रात हवाई ऑपरेशन्सची गंभीरता आणि टिकून राहण्याची क्षमता वाढेल.5 / 10आधीच घेतला सराव - या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीवर आधीच संपूर्ण तयार झाली आहे. अलीकडेच इथे मोठ्या प्रमाणात सराव घेण्यात आला. त्यात राफेल, सुखोई ३० एमकेआयसारखी लढाऊ विमाने, C-130J सुपर हरक्यूलिस ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, डेर्नियर सर्व्हिलांस विमान, एडवान्स लाइट हेलिकॉप्टर ही विमाने हायवे स्ट्रिपवर यशस्वीपणे टेक ऑफ आणि लँडिंग करण्यात आले.6 / 10इतकेच नाही तर याठिकाणी टच अँन्ड गो मॅन्यूवर्स आणि कॉम्बेट फॉर्मेशन लँडिंगही करण्यात आले. हेलिकॉप्टरमधून जखमींना बाहेर काढण्यासाठीही सराव घेण्यात आला आहे. ही सुविधा युद्धासोबत मानवी मदत मिशनसाठीही काम करणार आहे.7 / 10विशेष म्हणजे आज १४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आयएएफच्या सी-१३०जे विमानातून या पट्टीवर उतरले आहेत. २०२१ मध्ये उत्तर प्रदेशातही अशाच प्रकारे हायवे स्ट्रिप बनवण्यात आली आहे. जिथे विमान लँडिंग करण्यात आले. हे सैन्याच्या ताकदीचे प्रदर्शनही आहे.8 / 10देशभरात ELF नेटवर्क - दिब्रुगड ELF हे एकमेव नाही. रस्ते वाहतूक मंत्रालय आणि IAF ने संयुक्तपणे देशभरात अशी २८ ठिकाणे निवडली आहेत. आसामध्ये ५ ठिकाणी ELF बनवण्यात येत आहे. काही आधीच सुरू आहेत. सर्व IAF एडवान्स लँडिंग ग्राऊंडससाठी आधुनिक बनवले गेले आहे.9 / 10ही सुविधा ईशान्येकडील संरक्षण मजबूत करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे. ब्रह्मपुत्रा नदीखाली प्रस्तावित अंडरवॉटर रोड रेल्वे बोगदा नदीच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांमधील जलद वाहतूक सुलभ करेल. अनेक मोक्याचे बोगदे आणि सर्व रस्ते पाऊस किंवा आपत्तींच्या काळातही कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करतील. या प्रकल्पांमुळे सिलिगुडी कॉरिडॉर (चिकन्स नेक) वरील अवलंबित्व कमी होईल आणि सैन्याची जलद तैनाती सुनिश्चित होईल.10 / 10ईशान्य भारत चीन, म्यानमार आणि बांगलादेश या संवेदनशील सीमांजवळ आहे. इथं नद्या, पर्वत आणि पूर यामुळे येथील भूभाग आव्हानात्मक आहे. त्यामुळे हे प्रकल्प नैसर्गिक आपत्ती आणि शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करतील. ते लष्करासाठी जलद प्रतिसाद आणि सुधारित रसद प्रदान करतील. संरक्षणासोबतच ते सामान्य लोकांपर्यंत कनेक्टिव्हिटी आणि विकास देखील आणतील.