By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 23:25 IST
1 / 10काही दिवसांपूर्वी जे धराली घडले, त्याची पुनरावृत्ती चशोटीमध्ये झाली. आभाळ फाटले अन् अख्खे गाव पाणी आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ऐन दुपारी लोक आपापल्या कामात व्यस्त असतानाच काळाने डंख मारला.2 / 10किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावाजवळ दुपारी १२.३० वाजता ढगफुटी झाली आणि काही क्षणातच गाव गाडले गेले. मचैल माता यात्रेसाठी असंख्य लोक इथे आलेले असतानाच ही घटना घडली.3 / 10पाणी आणि चिखलाचा प्रचंड मोठा लोंढा आला आणि गावातील घरे, भाविकांच्या गाड्या, टेंट, लंगर आणि यात्रेनिमित्त लागलेली दुकानांचा घास घेऊन गेला.4 / 10चशोटी किश्तवाड शहरापासून ९० किमी अंतरावर आहे. मचैल माता मंदिर रस्त्यावर हे गाव आहे. या भागात १८१८ ते ३८८८ मीटर उंच असणारे डोंगर आहे. त्यावर बर्फ पसरलेला आहे, ज्यामुळे पाण्याचा वेग प्रचंड वाढतो.5 / 10ही घटना घडल्यानंतर असंख्य लोक पाण्याचा प्रवाहात वाहून गेले. तर अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. जे वाचले त्यांच्या आक्रोशाने डोंगर दऱ्याही शहारल्या.6 / 10घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीन शोध आणि मदत कार्य हाती घेण्यात आले. एनडीआरएफ, लष्कराचे जवान, एसडीआरएफच्या तुकड्या पाठवण्यात आल्या.7 / 10मदतकार्य सुरू झाले. बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी श्वानांनाही आणण्यात आले असून, युद्ध पातळीवर हे कार्य हाती घेण्यात आले. अंधारपडेपर्यंत ५२ मृतदेह मिळाले असून, अजूनही शेकडो लोक बेपत्ता आहेत.8 / 10प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५० लोकांना वाचवण्यात यश आले असून, २०० पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सीआयएसएफच्या दोन जवानांचाही समावेश आहे.9 / 10ढगफुटीनंतरची चशोटीमधील जी दृश्ये समोर आली आहेत, ती काळीज पिळवटून टाकणारी आहेत. अनेक ठिकाणी मृतदेह बेवारस पडली आहेत.10 / 10बहुतांश ठिकाणी मृतदेह चिखलातून शोधून बाहेर काढण्यात आले. घरे जमीनदोस्त झाली आहेत. वाहने वाहून गेली आहेत, तर रस्तेही गुडूप झाले आहेत. ढगफुटीपूर्वी गजबजलेल्या चशोटीची अवस्थात स्मशानभूमीसारखी झालीये.