शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Live Updates : आनंदाची बातमी! कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' ठरणार 'हे' औषध; WHO नेही केली शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 2:22 PM

1 / 14
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक देशांमध्ये कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे.
2 / 14
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,22,193 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
3 / 14
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फायझरच्या 'पॅक्सलोव्हिड' टॅब्लेटला मान्यता दिली आहे. कोविड-19 विरूद्ध या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली जाईल. देशातील कोरोनाग्रस्तांमध्ये 'गेमचेंजर' ठरणारं हे औषध पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.
4 / 14
Hetero Labs भारतात या औषधाचं जेनेरिक व्हर्जन तयार करणार आहे. Pfizer ने गेल्या वर्षी 95 देशांमध्ये Paxlovid चं जेनेरिक व्हर्जन तयार करण्यासाठी वॉलंटरी लायसन्स देण्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील 'पॅक्सलोविड' ची शिफारस केली आहे.
5 / 14
डब्ल्यूएचओच्या मते, कोरोनाच्या माइल्ड आणि मॉडरेट रुग्णांना फायझर टॅबलेट द्यावी. सध्या ही टॅबलेट प्रिस्क्रिप्शनवरच उपलब्ध असेल. एका रुग्णाला 5 दिवसांत एकूण 30 गोळ्या घ्याव्या लागतात. दिवसातून दोनदा तीन गोळ्यांचा डोस असेल.
6 / 14
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारीच्या उपचारासाठी फायझरच्या 'पॅक्सलोविड' गोळीची शिफारस केली आहे. यापूर्वी, रेमडेसिवीर आणि मोलानुपिराविरला मान्यता देण्यात आली आहे.
7 / 14
WHO ने शुक्रवारी सांगितले की ते Pfizer ची अँटी-व्हायरल गोळी, Paxlovid वापरण्याची शिफारस करते. रुग्णालयात दाखल होण्याचा धोका असलेल्या सौम्य आणि मध्यम कोरोना रुग्णांना ते दिले जाऊ शकते.
8 / 14
सध्या कोणत्याही राज्यात अत्यंत गंभीर परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. अनेक राज्यांमध्ये साप्ताहिक संसर्ग दर पाच टक्क्यांच्या वर आहे. यामध्ये दिल्लीचे नाव आघाडीवर आहे.
9 / 14
सध्या दिल्लीतील 11 जिल्ह्यांपैकी 6 जिल्हे असे आहेत जिथे साप्ताहिक संसर्ग दर 5 टक्क्यांहून अधिक म्हणजे 8 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
10 / 14
हरियाणातील एक शहर, मध्य प्रदेशातील एक आणि मणिपूर, मेघालय, मिझोराम आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक शहर आहे जिथे संसर्ग दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त आहे. अनेक राज्यांमध्ये अशी काही शहरे आहेत जिथे साप्ताहिक संसर्ग दर 10 टक्क्यांहून अधिक आहे.
11 / 14
दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये हे प्रमाण 11.35 टक्के आहे. केरळमध्ये 14 शहरे अशी आहेत जिथे साप्ताहिक संसर्ग दर 10 टक्क्यांहून अधिक आहे. मिझोरामचे नाव देखील आहे, ज्यांच्या 7 शहरांनी साप्ताहिक संसर्ग दर 10 टक्क्यांहून अधिक ओलांडला आहे.
12 / 14
देशात तीन दिवसांपासून नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, परंतु दिल्लीत एप्रिलच्या सुरुवातीपासून नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. दिलासादायक बाब अशी आहे की त्याचा गंभीर परिणाम दिसून आलेला नाही.
13 / 14
डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे की, कोरोनाविरोधी औषधांची उपलब्धता आणि किमतींमध्ये पारदर्शकतेचा अभाव हे अजूनही मोठे आव्हान आहे. यामुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना उपचारासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जाऊ शकते.
14 / 14
कोरोनापुढे अनेक प्रगत देश देखील हतबल झाले आहेत. रुग्णसंख्या सतत वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना