ओदिशातील बीजू पटनायक विमानतळावर चित्रांच्या माध्यमातून प्रकटले भगवान जगन्नाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 03:57 PM2019-07-04T15:57:44+5:302019-07-04T16:08:41+5:30

ओदिशामधील जनतेचे आराध्य दैवत असलेल्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, ओडिशामधील बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावरही भगवान जगन्नाथ चित्ररूपाने प्रगट झाले आहेत.

भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेवर बेतलेले हे चित्र प्रदर्शन ओडिशा ललित कला अकादमीच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रदर्शन 2 ते 12 जुलैदरम्यान चालणार आहे. या प्रदर्शनात जगन्नाथ रथयात्रेसंबंधित असणारी विविध छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

प्रदर्शनात मांडण्यात आलेली भगवान जगन्नाथांची काही चित्रे.