शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 23:40 IST

1 / 6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी भारताच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. तसेच यादरम्यान, सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाही काही शूर सर्वसामान्य नागरिकांनी जवानांना सर्वतोपरी मदत केली होती. अशाच एका १० वर्षीय मुलाला भारतीय लष्करानं सन्मानित करत मोठं बक्षीस दिलं आहे.
2 / 6
शवन सिंह (स्वर्ण सिंह) असं या १० वर्षीय मुलाचं नाव असून, तो पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील तारावाली गावातील रहिवासी आहे. त्याने ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय लष्करातील जवानांना जीव धोक्यात घालून चहा. दूध आणि लस्सी पोहोचवली होती. आता त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा भारतीय लष्कराने केली आहे.
3 / 6
भारतीय लष्कराच्या गोल्डन अॅरो डिव्हिजनने शवन सिंह याच्या साहसाचं कौतुक करताना त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी फिरोजपूर छावणीमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टिनेंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी शवन याचा सत्कार केला.
4 / 6
७ मे रोजी पहाटे भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले होते. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवरून भारतीय चौक्यांवर गोळीबार सुरू करण्यात आला होता.
5 / 6
त्यावेळी शवन सिंह याने लढणाऱ्या जवानांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यासाठी पाणी, बर्फ, चहा, दूध आणि लस्सी नेली होती. तणावपूर्ण वातावरण असताना जीवाची पर्वा न करता शवन सिंह याने केलेल्या मदतीमुळे जवान भारावले होते.
6 / 6
दरम्यान, मोठं होऊन आपल्यालाही जवान व्हायचं आहे, मला देशसेवा करायची आहे, असे शवन सिंह याने सांगितले. तर शवन सिंह याच्या वडिलांनीही तो कुणीही न सांगता स्वत: जवानांसाठी खाऊ घेऊन गेला होता, असे सांगितले. आता भारतीय लष्कराने शवन सिंह याने केलेल्या मदतीची कहाणी ही प्रेरणादायी आहे, अशा शब्दात त्याचं कौतुक केलं आहे.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानPunjabपंजाबStudentविद्यार्थी