शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदींची मुख्यमंत्री शिंदेंसोबत 'चाय पे चर्चा', पंतप्रधानांना भेट दिलं 'हे' पुस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:16 PM

1 / 9
१ डिसेंबर २०२२ रोजी भारताने जी२० या जगातील राष्ट्रसमुहांच्या गटाचे अध्यक्षपद अधिकृतपणे स्वीकारले. याअनुषंगाने राष्ट्रपती भवन येथील कल्चरल सेंटर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीचं आयोजन केलं होतं.
2 / 9
मोदींच्या अध्यक्षतेखाली राज्यांचे मुख्यमंत्री व संसदेचे प्रतिनिधित्व करणारे पक्षांचे अध्यक्षांसोबत ही बैठक घेण्यात आली. त्यानंतर, पंतप्रधानांनी सर्वच राज्याच्या मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांशी चर्चाही केली.
3 / 9
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या बैठकीला हजेरी लावून महाराष्ट्रात होणाऱ्या १४ बैठकांच्या नियोजनाचे सादरीकरण केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चाय पे चर्चाही केली.
4 / 9
संपूर्ण देशभरात यानिमित्ताने १६१ हून अधिक बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून यातील १४ बैठका महाराष्ट्रात आयोजित करण्यात येणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहून G20 शिखर परिषदेच्या बैठकांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने महत्वपूर्ण सुचनांचे सादरीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत केले.
5 / 9
यावेळी, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गतीमान महाराष्ट्र नावाचे पुस्तकही भेट दिले. या पुस्तकात शिंदे-फडणवीस सरकारच्या गेल्या ४ महिन्यातील कार्याचा आढावा असल्याचे समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही हे पुस्तक भेट देण्यात आले.
6 / 9
दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही भेट घेत संवाद साधला.
7 / 9
नरेंद्र मोदींच्या हातात चहाचा कप दिसून येत आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या हातातील पुस्तकाची माहिती त्यांना सांगत आहेत.
8 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीदरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशीही संवाद साधला.
9 / 9
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पाहताच हात जोडले, तर शेजारीत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हात बांधून उभ्या असल्याचं दिसून येत आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदेdelhiदिल्लीChief Ministerमुख्यमंत्री