Narendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:29 AM2019-09-17T11:29:26+5:302019-09-17T11:31:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा 69 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज नरेंद्र मोदी ज्या यशाच्या शिखरावर पोहचले आहेत त्यामागे एका व्यक्तीची महत्वपूर्ण भूमिका आहे. ज्यांनी मोदींनी शिस्त आणि राजनीती याचे धडे दिलेत. ती व्यक्ती म्हणजे लक्ष्मणराव इनामदार.

लक्ष्मणराव इनामदार हे गुजरातमध्ये संघाचे प्रचारक होते त्यादरम्यान नरेंद्र मोदींची त्यांच्यासोबत भेट झाली. चहावाला ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान या संपूर्ण राजकीय प्रवासात वकील लक्ष्मणराव इनामदार यांची भूमिका महत्वाची आहे.

लक्ष्मणराव इनामदार हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील आहेत. हैद्राबाद निजामशाहीविरोधात त्यांनी मोर्चा काढला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्यानंतर ते संघाचे ते पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करु लागले. गुजरातमध्ये त्यांनी आयुष्यभर संघाचा प्रचार केला.

गुजरातमध्ये त्यांनी संघाचा प्रचार करत राज्यभर फिरले. गुजरातमधील वडनगर येथे सभांना संबोधित करताना मोदी त्यांच्या भाषणांकडे आकर्षित होऊ लागले. काळांतराने नरेंद्र मोदी लक्ष्मणराव इनामदार यांच्या सानिध्यात आले. संघाच्या प्रचारकांसाठी ते चहा बनविण्याचं काम करत होते.

1972 मध्ये लक्ष्मणराव इनामदारांनी नरेंद्र मोदींना संघाचे प्रचारक बनविले, 1985 मध्ये लक्ष्मणराव यांचे निधन झाले. मोदींनी अनेकदा भाषणात लक्ष्मणराव इनामदार यांचा उल्लेख केला आहे.