सैन्य दिनी नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफच्या जवानांची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 13:57 IST2018-01-16T13:53:43+5:302018-01-16T13:57:12+5:30

सैन्य दिनाच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर हुसैनीवाला बॉर्डरवर गेले होते. नाना पाटेकर यांची पत्नी नीलाकांती पाटेकरही यावेळी उपस्थित होत्या.

नानांनी यावेळी शहीद स्मारकारवर जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ते रिट्रीट सेरेमनीमध्ये सहबागी झाले होते.

नाना पाटेकर यांनी यावेळी शहिदांच्या शौर्याचं व कामगिरीचं भरभरून कौतुक केलं.

नानांनी जवानांबरोबर गप्पागोष्टी करत बराच वेळ घालवला. तसंच हुसैनीवाला बॉर्डरबद्दलची माहितीही जाणून घेतली.