शेतातल्या धान्यांपासून मोदींचं 8 फुटी पोट्रेट, प्रियंकानं दिलं बर्थ डे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 12:25 PM2021-09-17T12:25:31+5:302021-09-17T12:44:33+5:30

विशेष म्हणजे भाजपकडून आजपासून 3 आठवडे म्हणजेच 7 ऑक्टोबरपर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. मोदींच्या बर्थ डेचे 21 दिवस सेलिब्रेशन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71 वा वाढदिवस देशभरात साजरा होत आहे. देशातील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जात आहे.

विशेष म्हणजे भाजपकडून आजपासून 3 आठवडे म्हणजेच 7 ऑक्टोबरपर्यंत वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत. मोदींच्या बर्थ डेचे 21 दिवस सेलिब्रेशन होणार आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते गावागावातील कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंकाने सहानी या कलाकार मुलीने धान्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पोट्रोट चित्र बनवलंय. भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच, शेतात पिकणाऱ्या धान्यांपासून हे पंतप्रधानांचं चित्र बनवल्याचं प्रियंकाने म्हटलंय.

पंतप्रधान मोदींचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न आपण केल्याचे प्रियंकाने म्हटले आहे. पत्तचित्र हे ओडिशातील परंपरा या पोट्रेट चित्रात दिसून येते, असेही प्रियंकाने म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर भारत देशाचा भार सोपविण्यात आल्याचे चित्रातून दिसत आहे. वेगवेगळ्या रंगाच्या डाळींचा वापर हे चित्र बनिण्यासाठी करण्यात आला आहे.

आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत. म्हणूनच, ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेले आहेत, अशा शब्दात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या प्रंतप्रधानांचा उल्लेख ‘युगपुरूष’ असा करणं खरोखरी सार्थ आहे. अंगावर चाल करून आलेल्या आव्हानांमुळे नामोहरम न होता आजचा काळ समजून घेत आणि त्याला आकार देत देशाच्या उज्ज्वल भविष्याचं विधीलिखित त्यांनी घडवलं आहे, असे केंद्रीयमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलंय.

देशभरात 7 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे.