दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 02:32 PM2020-07-19T14:32:17+5:302020-07-19T14:39:42+5:30

दूध जर संक्रमित झालेले असेल तर असा प्रश्न मनात डोकावू लागतो. यावर एफएसएसएआयने उत्तर दिले आहे.

घरात आणल्यावर किंवा बाहेरच या वस्तू पाण्यामध्ये किंवा अल्कोहोल मारून सॅनिटाईज करण्याकडे लक्ष देत आहेत. काही ठिकाणी तर साबनाने धुतल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशावेळी आपण जी रोज दुधाची अर्धा, एक लीटर दुधाची पिशवी घेतो ती कोरोना फ्री आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

हा प्रश्न निश्चितरित्या तुम्हाला दुविधेमध्ये टाकणार आहे. कारण मेडिकल आणि किराना मालाच्या, दुधाच्या दुकानांना स्थानिक लॉकडाऊनमध्येही परवानगी आहे. यामुळे तिथून कोरोना पसरण्याची शक्यता अधिक आहे.

अशावेळी हे दूध जर संक्रमित झालेले असेल तर असा प्रश्न मनात डोकावू लागतो. यावर एफएसएसएआयने उत्तर दिले आहे. ( Food Safety and Standards Authority of India (FSSAI)

FSSAI सांगितले की, पॅकबंद दूध हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्याद्वारे कोरोनाची लागण होऊ शकत नाही. दुधाच्या पिशव्या या साबनाने धुतल्या जात असल्याचे समजताच एफएसएसएआयने दूधाच्या सुरक्षित वापरावर काही उपाय सांगितले आहेत.

पहिला म्हणजे दूधवाला किंवा कोणत्याही दुकानातून दुधाची पिशवी घेताना सरकारने घालून दिलेले सामाजिक सुरक्षा, मास्क आदी नियम पाळावेत. तसेच विक्रेत्यानेही मास्क घातला आहे का हे पहावे.

FSSAI ने लोकांना आवाहन केले आहे की, दूध पाकिट घेतल्यानंतर ते घरी आणावे. आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत. तसेच दुधाची पिशवी केवळ पाण्याने धुवून घ्यावी. दुधाच्या पाकिटावर सॅनिटायझर स्प्रे केल्यानंतर या डिटर्जंट किंवा सॅनिटाझर मारण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

दूध पाण्याने धुवून घेतल्यानंतर पिशवी फोडून धुतलेल्या हातांनी भांड्यामध्ये ओतावे. यानंतर दूध पूर्ण उकळेपर्यंत गॅस बंद करू नये.

FSSAI ने सांगितले की या सोप्या उपायांनी तुम्ही वापरत असलेले दूध कोरोना सुरक्षित असल्याचा विश्वास वाटेल.

FSSAI नुसार रासायनिक सॅनिटायझर स्प्रे किंवा डिटर्जंटचा वापर दुधासाठी करणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.