शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मारुती कार असेल तर लवकर घ्या ही फ्री ऑफर..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 7:30 PM

1 / 5
तुमच्याकडे जर मारुती सुझुकीची कार असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशाच्या सर्वात मोठ्या वाहतूक क्षेत्रातील कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. उन्हाळ्याच्या दिवशात थंडा कूल राहण्यासाठी मारुतीने मोफत सर्व्हिस ऑफर सुरु केली आहे. देशभरातील 2200 सर्व्हिस सेंटरवर ही ऑफर मिळणार आहे.
2 / 5
मारूतीने खास Summer Ready Vehicle Health Check सुरु केलं आहे. या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत देशातील मारुती कारचे ग्राहक या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. या विशेष ऑफरमध्ये कारच्या काही भागांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे.
3 / 5
या सर्व्हिसमध्ये एअर कंडिशनर, कूलेंट, बॅटरी, इलेक्ट्रिकल सिस्टम आणि टायर यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. मारुतीच्या टेक्निकल टीमकडून ही गाडीची पूर्ण चेकींग केली जाणार आहे.
4 / 5
मारुती सुझुकीच्या कंपनीनुसार दिवसाला 50 हजारपेक्षा जास्त गाड्यांची सर्व्हिस केली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एअर कंडिशनर आणि इलेक्ट्रिकल सिस्टमसारख्या सोयींचा जास्त वापर ग्राहकांकडून करण्यात येतो.
5 / 5
मागील वर्षी मारुतीकडून Summer Ready Vehicle Health Check या अंतर्गत 2.2 लाख ग्राहकांनी या ऑफरचा फायदा उचलला होता. त्याचसोबत जूनपर्यंत मारुती नवीन गाडी अल्टो नव्या ढंगात नव्या रुपात ग्राहकांनासमोर आणणार आहे.