शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : एलपीजी गॅससाठी फोन आला तर सांभाळून! फ्रॉड करणाऱ्यांनी काढली नवीन आयडिया; या चूका अजिबात करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:06 IST

1 / 7
इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' बंद केल्यामुळे जगभरात तेलाचा आणि गॅसची कमतरता भासत आहे. भारतातही केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस वापरावर बंधने आणली आहेत. यामुळे अनेक लोकांना नवीन सिलिंडर खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. लोकांची फसवणूक करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.
2 / 7
सायबर स्कॅमर लोकांना त्यांच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी कॉल किंवा मेसेज करतात. त्यानंतर ते एलपीजी सिलेंडर डिलिव्हरीच्या बहाणे सांगतात. त्यानंतर ते त्यांना त्यांचा बँक ओटीपी किंवा लिंक शेअर करण्यास सांगतात.
3 / 7
दिल्ली पोलिसांनी या संदर्भात निवेदन प्रसिद्ध केले आहे, यामध्ये लोकांना एलपीजी सिलेंडर बुकिंगशी संबंधित घोटाळ्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
4 / 7
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत 'एक्स' प्लॅटफॉर्मवर एक सूचना पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा सायबर गुन्हेगारांनी रचलेल्या खोट्या आहेत.
5 / 7
या पोस्टमध्ये एक व्हिडीओ देखील आहे. सायबर गुन्हेगार निष्पाप लोकांना कसे अडकवतात हे दाखवण्यात आले आहे. सुरुवातीला एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो.
6 / 7
व्हिडिओच्या शेवटी, पोलिस सांगतात की, सायबर गुन्हेगार एलपीजी सिलिंडर बुकिंग इत्यादीसाठी अनेक लोकांना फसवत आहेत. ते तुम्हाला सिलिंडर बुक करण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगू शकतात किंवा ओटीपी मागू शकतात.
7 / 7
चुकूनही एखाद्या माहिती नसलेल्या लिंकवर क्लिक केल्याने किंवा ओटीपी शेअर केल्याने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. म्हणून, अज्ञात नंबरवरून येणाऱ्या लिंकवर क्लिक न करणे महत्वाचे आहे. अज्ञात नंबरवरून कॉल करणाऱ्या कोणालाही तुमचा बँक ओटीपी किंवा इतर माहिती कधीही शेअर करू नका. असे केल्याने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
टॅग्स :fraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई