'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 20:17 IST2018-09-12T16:29:51+5:302018-09-12T20:17:43+5:30

आयएएस टॉपर टीना दाबी आणि अतहर आमीर अली खान यांनी ताजमहालला भेट देऊन आपले प्रेम व्यक्त केलं.
प्रशासकीय सेवेतील देशातील सर्वात लोकप्रिय जोडी टीना अन् आमीर यांनी प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालचे खूप कौतूक केले. तसेच ताजमहाल येथे मनसोक्त आनंद घेतला.
टीना आणि आमीर हे 2015 च्या आयएएस बॅचचे टॉपर आहेत. विशेष म्हणजे दोघांचा धर्म वेगळा असून या जोडप्याने प्रेमविवाह करुन तरुणाईसमोर आदर्श ठेवला आहे.
आयएएस परीक्षेत टीना दाबी देशात पहिली आली होती, तर आमीर देशात दुसरा आला होता. प्रशिक्षण काळात या दोघांची गट्टी जमली.
काही दिवसांतच जुळलेल्या प्रेमाची लग्नगाठ बांधत टीना आणि आमीर यांनी सुखी संसाराला सुरूवात केली.