लंडनचे महापौर सादिक खान यांनी जालियनवाला बागेला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:00 IST2017-12-07T14:57:36+5:302017-12-07T15:00:48+5:30

लंडनचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून ओळखले जाणारे सादिक खान हे 6 दिवसांच्या भारत व पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.

बुधवारी (6 डिसेंबर 2017 ) सादिक खान हे अमृतसरमध्ये होते. यावेळी त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली.

येथील अभ्यांगताच्या वहीमध्ये लिहिले की, ब्रिटन सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे.

सादिक खान 2016 मध्ये लंडनच्या महापौरपदी निवडून आले आहेत.