शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरपासून समोशांपर्यंत असं असेल दरपत्रक, निवडणूक आयोगाचा असा आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 2:28 PM

1 / 6
या आठवडाभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवार विविध गोष्टींवर वारेमाप खर्च करत असतात. त्याला आळा घालण्यासाठी आणि निवडणुका निष्पक्ष पद्धतीने व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असतो. यावेळीही निवडणुका निष्पक्षपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोग प्रचारात वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे दर निश्चित करून नियमावली तयार करत असतो.
2 / 6
मिळत असलेल्या माहितीनुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीची यादी तयार करण्यास सांगितले आहे. यामध्ये समोसे, भोजनाची थाळी, साऊंड सिस्टिम, हेलिकॉप्टर, टेंपो आणि इतर वाहनांच्या भाड्याचा समावेश आहे.
3 / 6
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर काही जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रचारामध्ये वापरणाऱ्या वस्तूंचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गौतमबुद्धनगरचे जिल्हा निर्वाचन अधिकाऱ्यांनी एका समोशाची किंमत १० रुपये आणि एका भोजनाच्या ताटाचा दर १०० रुपये एवढा निश्चित केला आहे.
4 / 6
\निवडणुकीच्या प्रचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींच्या दरांची निश्चिती ही राजकीय पक्षांशी चर्चा केल्यानंतर केली जावी, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाचं आकलन हे याच दरांच्या आधारावर केलं जाणार आहे.
5 / 6
प्रचारात वापरल्या जाणाऱ्या वाहनांचं भाडं हे सर्व उमेदवारांच्या खर्चामध्ये एक समान दरानं जोडलं जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या खर्चामध्ये पारदर्शकता कायम राहील. निवडणुकीमध्ये कुणासोबतही भेदभाव आणि पक्षपात होता कामा नये. पारदर्शक निवडणुका हा लोकशाहीचा पाया आहे.
6 / 6
गौतमबुद्धनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २८० वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे, त्या निवडणूक प्रचारात समाविष्ट होऊ शकतात. हेलिकॉप्टरचा वापर उमेदवाराच्या खर्चामध्ये २.३० लाख रुपये मोजले जातील. तर एका ड्रोनसाठी १६ हजार रुपये निवडणूक खर्चामध्ये मोजले जातील.
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग