Lockdown : 11 देशांच्या प्रवासावर सायकलने निघालेला हंगेरियन पर्यटक बिहारच्या हॉस्पिटलमधून पळाला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:54 AM2020-05-29T11:54:41+5:302020-05-29T12:16:50+5:30

व्हिक्टरला आशा होती की, काही दिवसांनी त्याला प्रशासनाकडून कोलकाता मार्गे दार्जिलिंगला जाण्याची परवानगी मिळले. पण तसं काही झालं नाही.

एका खास सायकलने हंगरीहून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पर्यटकाला लॉकडाउन दरम्यान बिहारच्या छपरामध्ये क्वारंटाइन करण्यात आलं होतं. 55 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतरही त्याला सोडण्यात आलं नव्हतं. अखेर कंटाळून पर्यटक तिथून पळाला, पण पोलिसांनी पुन्हा त्याला पकडून हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे. (Image Credit : aajtak.intoday.in)

हंगेरीहून 11 देशांच्या प्रवासावर आपल्या विशेष सायकलने निघालेला हंगेरीचा पर्यटक व्हिक्टर जिको याला 29 मार्चला छपरा पोलिसांनी लॉकडाउनदरम्यान रिविलगंजमधून पकडून कोरोनाची टेस्ट करण्यासाठी पाठवलं. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तरी सुद्धा त्याला 14 दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

व्हिक्टरला आशा होती की, काही दिवसांनी त्याला प्रशासनाकडून कोलकाता मार्गे दार्जिलिंगला जाण्याची परवानगी मिळले. पण तसं काही झालं नाही.

दरम्यान गेल्या 10 एप्रिलच्या सकाळी व्हिक्टरच्या रूममधून त्याचा लॅपटॉप, स्विस नाइफ, 4 हजार रूपये. मोबाइल आणि कपडे गायब झाले. पोलिसांनी पुढील तीन दिवसात या वस्तूंसह चोरांना पकडलं. फक्त स्विस चाकू काही मिळाला नाही. चोराने व्हिक्टरचा पासपोर्टही जाळून टाकला होता. त्याचे कपडे आणि त्यातून मिळालेल्या 2 हजारांच्या दोन नोटाही जाळल्या होत्या.

व्हिक्टरने पासपोर्टसाठी अर्ज केल्यावर त्याला दुसरा पासपोर्ट काढता आला. पण लॉकडाउनमुळे कुरिअर सेवा बंद असल्याने त्याच्यापर्यंत तो पोहचला नव्हता. आता काही दिवसांपूर्वी त्याला तो पासपोर्ट मिळाला. 55 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून राहून व्हिक्टर वैतागला होता. त्याने सर्वच अथॉरिटीला दार्जिलिंग जाण्याची परवानगी मागितली. पण त्याच्या हाती सगळीकडून निराशाच लागली.

व्हिक्टरने यादरम्यान राजद नेता तेजस्वी यादवसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणंही केलं. त्यांनी व्हिक्टरला मदत करण्याचं आश्वासन दिलं.

व्हिक्टरला दार्जिलिंगच्या लेबांग कार्ट रोज येथील एलेक्झांडर सीसोमा डी कोरोस यांच्या समाधीवर जायचं आहे. सीसोमा हे तिबेटीयन भाषा आणि बौद्ध दर्शनाचे जाणकार होते. ते एशियाटीक सोसायटीसोबतही जुळलेले होते. त्यांनी पहिली तिबेटीयन-इंग्लिश डिक्शनरी लिहिली होती. तसेच मानले जाते की, त्यांना 17 भाषा येत होत्या.

2012 मध्ये हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, दार्जिलिंग म्युनिसिपालिटीने कोवासजना(रोमानिया) जिथे एलेक्झांडरचा जन्म झाला आणि दार्जिलिंग जिथे त्यांचा मृत्यु झाला. या दोन्ही ठिकाणांना ट्विन सिटीज घोषित करण्याचा प्रस्ताव दिला होता.

व्हिक्टरला अॅडव्हेंचर आणि फोटोग्राफीची आवड आहे. त्याचं मत आहे की, अनेक अडचणींचा प्रवास सततचा प्रवास आणि फोटोग्राफी हा त्याच्या जीवनाचा भाग झाला आहे. तो उंचच डोंगराहून ट्रेकिंगही करतो.