वेगळ्या धर्माचा दर्जा दिल्याने लिंगायत समाजाने व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 23:34 IST2018-03-19T23:34:02+5:302018-03-19T23:34:02+5:30

कर्नाटक सरकारने यावर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठा मतदारवर्ग असलेल्या लिंगायत समुदायाला वेगळ्या धर्माचा दर्जा दिला आहे.
या निर्णयानंतर लिंगायत समाजाने रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला.
निर्णयाचे स्वागत करण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी लिंगायत समाजातील अनुयायी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते.