शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेत्यांचा 'योगा'त्सव, आम्ही सारे 'योगा-डे'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 12:27 PM

1 / 12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमधील रांची येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला, त्यावेळी केलेलं योगासन
2 / 12
हरयाणातील रोहतक येथे केंदीय गृहमंत्री अमित शहा यांनी योगा दिनानिमित्त योगासने केली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री मनोहर लाल ठक्कर हे होते.
3 / 12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात योगासन करुन जागतिक योग दिवस साजरा केला
4 / 12
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही होम ग्राऊंड असलेल्या नागपुरात योगा दिन साजरा केला, यावेळी योग आसन करताना गडकरी
5 / 12
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी डोंगरी येथील एका बालकाश्रमात जाऊन तेथील मुलींसमवेत योगासने केली, योगासनाच महत्वही त्यांनी मुलींना पटवून दिलं
6 / 12
योग साधना अत्यंत गरजेची असून योगामुळे शरीरासह मनही प्रसन्न राहत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितल.
7 / 12
मंत्रालयाच्या आवारातही सकाळीच सनदी अधिकारी, मंत्री आणि कर्मचाऱ्यांनी योगासने करुन योग दिवस साजरा केला.
8 / 12
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या मार्गदर्शनात गेट वे ऑफ इंडिया येथे योगासने करत योग दिवस साजरा केला.
9 / 12
मंत्रालयातील त्रिमूर्ती पटांगणामध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योगासने केली, योग दिनाचा उत्साह मंत्रालयातही पाहायला मिळाला
10 / 12
मंत्रालयात उपस्थित कर्मचाऱ्यांसमवेत योगा टीचरच्या मार्गदर्शनात विविध आसने करताना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
11 / 12
नवनिर्वाचित शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही बाबा रामदेव यांच्या मार्गदर्शनात विधिमंडळात योगा डे साजरा केला.
12 / 12
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी संसदेतील आवारात योग दिनानिमित्त योगासने केली. यावेळी त्यांच्यासमवेत अनेक खासदार आणि अधिकारीही हजर होते.
टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगAmit Shahअमित शहाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसraosaheb danveरावसाहेब दानवे