Labour Day 2019: 'तो' राबतो, म्हणून आपण जगतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:46 IST2019-05-01T14:39:26+5:302019-05-01T14:46:32+5:30

आज जागतिक आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. कोणत्याही देशाच्या विकासात कामगारांच्या कष्टांचा मोठा वाटा असतो. देशाच्या विकासात योगदान देणारी ही कामगार महिला, जम्मूतल्या विटांच्या भट्टीत काम करताना.
नवी दिल्लीत पुलाच्या उभारणीचं काम करताना एक कामगार.
दिल्लीच्या मसाला मार्केटमध्ये सामानाच्या गोणी उतरवणारा कामगार.
रेल्वे कायम धावत राहावी यासाठी उन्हात राबणारा कामगार वर्ग.
मुंबईतल्या डाय फॅक्टरीत काम करणारा कामगार.
अगरताळ्याच्या प्लास्टिक रिसायकलिंग फॅक्टरीत काम करण्यात व्यस्त असलेला कामगार.
कोलकात्यात वेल्डिंगच्या कामात गढून गेलेला कामगार.