काश्मीर - पोलिसांवर दगडफेक करणारी तरूणी बनली फुटबॉल टीमची कॅप्टन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:14 IST2017-12-06T16:10:50+5:302017-12-06T16:14:19+5:30

श्रीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे चर्चेत आलेली 23 वर्षीय खेळाडू अफ्शान आशिक आता जम्मू-काश्मीरच्या महिला फुटबॉल टीमची कॅप्टन बनली आहे.
काही महिन्यांपूर्वी काश्मीरमधल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांच्या पोस्टरवर झळकलेली अफ्शानने मंगळवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
अफ्शानने मंगळवारी जम्मू-काश्मीर महिला फुटबॉल टीममधील इतर खेळाडुंसह गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
अफशाच्या आयुष्यावर लवकरच सिनेमा बनविला जाणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक अफशावर सिनेमा बनवणार असल्याची चर्चा आहे.