प्ले स्टोअरवरून हटवलेल्या टीक टॉकचा भारतीय असा घेताहेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 15:57 IST2019-04-22T15:48:36+5:302019-04-22T15:57:26+5:30

अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले टीक टॉक अॅप गुगलने नुकतेच प्ले स्टोअरवरून हटवले आहे.
मात्र टीक टॉक हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवल्याच्या बातमीवर अनेक मोबाईल युझर्सचा अजून विश्वास बसलेला नाही. त्यांच्याकडून हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवण्यात येत आहेत.
गुगलने प्ले स्टोअरवरून हटवलेले टीक टॉक हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस प्रणाली असलेल्या मोबाईल धारकांना डाऊनलोड करता येणार नाही.
दरम्यान, सध्या गुगल ट्रेंडवर ‘how to download TikTok', ‘download TikTok App' असे सर्च मोठ्या प्रमाणावर होत आहे. टीक टॉक प्ले स्टोअरवरून हटवल्याच्या वृत्तावर विश्वास नसल्याने अनेकजण असे सर्च करून खातरजमा करत आहेत.
टीक टॉक हे अॅप आतापर्यंत 100 कोटी वेळा डाऊनलोड केले गेले आहे. मात्र आता हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही. पण याआधी ज्यांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे त्यांच्याकडे टीक टॉक चालू राहणार आहे.