शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रवाशांसाठी खूशखबर! रेल्वे संबंधित कुठलीही तक्रार असल्यास 'या' नंबरवर करा फोन; लगेचच सोडवणार समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 12:47 PM

1 / 15
दररोज हजारो लोक हे रेल्वेने प्रवास करत असतात. मात्र अनेकदा प्रवास करताना काही अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता रेल्वे प्रवाशांना चिंता करण्याची गरज नाही. कारण त्यांच्या समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहेत.
2 / 15
रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक एकत्र केले आहेत. भारतीय रेल्वेने उपलब्ध सर्व हेल्पलाईन क्रमांकांऐवजी आता 139 क्रमांक जारी केला आहे. यामुळे प्रवाशांना हा क्रमांक लक्षात ठेवणं आणि रेल्वेशी संपर्क करणं अधिक सोपं होणार आहे.
3 / 15
139 या हेल्पलाईन क्रमांकावर आता प्रवाशांना सर्व माहिती आणि तक्रारही करता येणार आहे. विभागीय रेल्वे मंडळंही 139 क्रमांकाशिवाय दुसरा कुठला हेल्पलाइन क्रमांक आता जारी करणार नाहीत.
4 / 15
नवीन क्रमांक हा रेल्वेच्या सुविधांचा उपयोग करणाऱ्या एकीकृत सेवा देईल अशी माहिती देण्यात आली आहे. सेवा, सुरक्षा, तक्रार, खाद्यपदार्थ आणि सतर्कतेसाठी 139 क्रमांक डायल करता येईल. हा क्रमांक सुरू होताच आधीचे सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद केले जाणार आहेत.
5 / 15
139 हा हेल्पलाईन क्रमांक वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल आणि आयव्हीआरएस ( इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम ) आधारित आहे. मोबाईल वापरणाऱ्या सर्वांना 139 क्रमांकावर फोन करता येईल.
6 / 15
या क्रमांकावर प्रवासी, ट्रेन संबंधित सखोल माहिती आणि पीएनआर स्थिती, तिकीट (सामान्य आणि तत्काळ ) उपलब्धता, ट्रेन येण्याची वेळ, निघण्याची वेळ, प्रवासाची वेळ जाणून घेण्याच्या वेळेसोबतच आरक्षणासंबंधीची माहिती ही एसएमएसद्वारे मिळवता येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 15
रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना कंटाळा येतो. मात्र आता धावत्या रेल्वेतून प्रवास करताना तो प्रवास प्रवाशांना कंटाळवाणा वाटणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे.
8 / 15
रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरू केली जाणार आहे. नव्या सुविधेचा प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.
9 / 15
नव्या सुविधेनुसार, प्रवाशांना रेल्वेत प्रीलोडेड मल्टीलिंगुअल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. ज्यामध्ये चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असणार आहे.
10 / 15
रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवलं जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत आणि वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.
11 / 15
रेल्वेही सुविधा 5 हजार 723 उपनगरी रेल्वे आणि 5 हजार 952 वाय-फाय असणाऱ्या रेल्वे स्थानकांसह 8 हजार 731 रेल्वे गाड्यांमध्ये चालू केली जाणार आहे. एक राजधानी एक्सप्रेस आणि एका पश्चिम रेल्वेतील एसी उपनगरीय रेकमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात आणि परीक्षणाच्या तयारीत आहे.
12 / 15
रेल्वे आणि रेलटेलमध्ये रेवेन्यूचं शेअरिंग हे 50 – 50 टक्के केलं जाणार आहे. त्यामध्ये पीएसयूला या सुविधेतून कमीतकमी 60 कोटी रुपयांचं वार्षिक उप्तन्न मिळणार असल्याची आशा आहे.
13 / 15
कंटेन्ट पेड आणि अनपेड फॉरमॅटमध्ये 10 वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेने प्रवास करताना मजा येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अजब निर्णय घेतलाय.
14 / 15
मध्य रेल्वेने आता मुंबई मेट्रोपोलियन रिजन म्हणजेच MMR रिजनमधील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 5 पटीनं वाढवली आहे. 10 रुपयांना मिळणारं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना मिळणार आहे.
15 / 15
कोरोनाची वाढती संख्या पाहता उन्हाळ्याच्या मोसमात प्लॅटफॉर्म होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वने हे पाऊल उचललं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे