1 / 2भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील अनेक भागांना लक्ष्य करून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन सोडले होते. मात्र भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी हे ड्रोन हवेतच नष्ट केले होते. हे ड्रोन तुर्कीमध्ये तयार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानने वापरलेले तुर्कीचे ड्रोन नेमके कोणते होते आणि त्यांची काय वैशिष्ट्ये होती याचा आपण आढावा घेऊयात. 2 / 2गुरुवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यादरम्यान, पाकिस्तानने वापरलेल्या ड्रोनच्या अवशेषांच्या फॉरेन्सिक विश्लेषणावरून हे ड्रोन तुर्कीमध्ये निर्मिती झालेले असिसगार्ड सोंगार मॉडेलचे असल्याचे समोर आले आहे.