1 / 12पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्राला संबोधत करत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती दिली. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे त्यांनी कौतुक केले. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यांचाही उल्लेख केला.2 / 12दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही. भारत दहशतवादाविरुद्धची कारवाई सुरूच ठेवेल अशी लास्ट वॉर्निंग भारताने पाकिस्तानला दिली. जाणून घेऊया PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे...3 / 12१. पंतप्रधान मोदी म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दाखवलेल्या क्रूरतेने देश आणि जगाला हादरवून टाकले. सुट्ट्या एन्जॉय करायला गेलेल्या निष्पाप नागरिकांना धर्माबद्दल विचारणे आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर, त्यांच्या मुलांसमोर निर्घृणपणे मारणे, हा दहशतीचा एक अतिशय भयानक चेहरा होता. ती क्रूरता होती. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हे दुःख प्रचंड वेदनादायी होते.4 / 12२. या दहशतवादी हल्ल्यानंतर, संपूर्ण राष्ट्रातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक समाज, प्रत्येक वर्ग, प्रत्येक राजकीय पक्ष दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईसाठी एकत्र आला. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले. भारतीयांच्या बहिणी किंवा मुलींच्या कपाळावरील सिंदूर पुसून टाकण्याचे काय परिणाम होतात हे आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक दहशतवादी संघटनांनी पाहिले.5 / 12३. पंतप्रधान म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हे फक्त एक नाव नाही, तर ते देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. ६ मे रोजी रात्री उशिरा आणि ७ मे रोजी पहाटे संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेचे फलितात रूपांतर पाहिले.6 / 12४. पंतप्रधान म्हणाले की, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आणि त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर अचूक हल्ले केले. भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल याची दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती, पण जेव्हा देश एकजूट असतो, राष्ट्र प्रथम या भावनेने भरलेला असतो, राष्ट्र सर्वोच्च असते, तेव्हा कठोर निर्णय घेतले जातात. निकाल आणले जातात आणि दाखवले जातात. दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते. म्हणूनच भारताने हे दहशतवादी मुख्यालय उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक भयानक दहशतवादी मारले गेले.7 / 12५. पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तान सीमेवर हल्ला करण्यास तयार होता पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर हल्ला केला. भारतासमोर पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे कशी तुटून पडली हे जगाने पाहिले. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणेने त्यांना आकाशातच नष्ट केले.8 / 12६. पंतप्रधान म्हणाले, भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी अचूकतेने हल्ला केला. पाकिस्तानी हवाई दलाच्या त्या हवाई तळांचे नुकसान केले, ज्यांचा पाकिस्तानला खूप अभिमान होता. पहिल्या तीन दिवसांत भारताने पाकिस्तानला इतक्या मोठ्या प्रमाणात नष्ट केले की त्यांनी कल्पनाही केली नव्हती.9 / 12७. भारताच्या आक्रमक कारवाईनंतर, पाकिस्तानने सुटकेचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आणि वाईट पराभवानंतर, १० मे रोजी दुपारी, पाकिस्तानी सैन्याने आमच्या डीजीएमओशी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले की जेव्हा पाकिस्तानने आवाहन केले की ते यापुढे कोणत्याही दहशतवादी कारवाया आणि लष्करी धाडस करणार नाहीत, तेव्हा भारतानेही त्याचा विचार केला.10 / 12८. मी पुन्हा एकदा सांगतोय की, आम्ही फक्त पाकिस्तानच्या दहशतवादी आणि लष्करी तळांवरील आमची प्रत्युत्तराची कारवाई स्थगित केली आहे, येत्या काळात आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक पावलाचे मोजमाप तो कोणत्या दृष्टिकोनातून घेतो याच्या आधारावर करू.11 / 12९. पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानचे सैन्य आणि सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत, त्यामुळे एक दिवस ते पाकिस्तानलाच नष्ट करतील. जर पाकिस्तानला टिकून राहायचे असेल तर त्याला त्याचे दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करावे लागतील.12 / 12१०. पंतप्रधान म्हणाले, भारताचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे... दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत आणि पाणी व रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक नवीन उच्चांक गाठला आहे.