९० रशियन जहाजांचा गुप्तपणे सागरी प्रवास, ३० जहाजं भारतात पोहोचली; खळबळजनक रिपोर्ट, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:54 IST
1 / 10खोट्या झेंड्याआड रशियाचे तेल भारतात - गेल्या नऊ महिन्यांत ३० जहाजांद्वारे ५४ लाख टन कच्चे तेल लपवून आणले देशात; २.१६ लाख कोटी रुपये तेलाची किंमत; तेलाची अशी आयात समुद्री कायद्याच्या कलम ९४चे उल्लंघन असल्याचा दावा केला जात आहे. 2 / 10अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्यानंतर भारताच्या स्वस्तातील रशियन तेल आयातीवर परिणाम झाला आहे. त्यातच ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर बंदी घातल्यामुळे भारताला तेल खरेदी करणे अवघड झाले आहे.3 / 10त्यामुळे भारताने ओळख लपवून खोट्या झेंड्याखाली गेल्या नऊ महिन्यांत ५४ लाख टन कच्चे तेल रशियाकडून आयात केले आहे. या तेलाची किंमत २.१ अब्ज युरो (२.१६ लाख कोटी रुपये) इतकी असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 4 / 10युरोपीय संशोधन संस्था सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एयरच्या अहवालातून ही माहिती समोर आली. रशियाकडून आता अशा खोट्या झेंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, तो रशियाच्या तेल निर्यातीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, या अहवालामुळे रशियावर इतर देशांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.5 / 10११.१ दशलक्ष टन रशियन तेल जागतिक बाजारात- सीआरईएच्या मते, जानेवारी ते सप्टेंबर २०२५ दरम्यान ११.१ दशलक्ष टन (१.१ कोटी टन) रशियन कच्चे तेल जगभरात पोहोचवण्यासाठी एकूण ११३ जहाजांनी बनावट झेंड्यांचा वापर केला. 6 / 10हा व्यवहार ४.७ अब्ज युरो इतका होता. सप्टेंबर २०२५ अखेर ९० रशियन जहाजे खोट्या झेंड्यांखाली चालत होती. डिसेंबर २०२४च्या तुलनेत यात तब्बल सहा पटीने वाढ झाली आहे. जहाज आपल्या खऱ्या देशाचा झेंडा न लावता दुसऱ्या देशाचा झेंडा लावून प्रवास करते. यामुळे त्याची खरी ओळख, मालक आणि मूळ देश शोधता येत नाही. त्यामुळे अशा जहाजांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. 7 / 10जुनी व धोकादायक जहाजे खोट्या झेंड्यांखाली चालू लागल्यामुळे युरोपीय समुद्री क्षेत्रांना गंभीर धोका वाढत आहे असं सहलेखक ल्यूक विकेंडन यांनी म्हटलं. त्याशिवाय अशा जहाजांवर कडक कारवाई करून ही पद्धत थांबवावी, अशी मागणी सहलेखक वैभव रघुनंदन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे.8 / 10रशियन तेलाकडे भारताचा ओढा, पण वाढला धोका - फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन-रशिया युद्धानंतर पश्चिमी देशांनी रशियावर घातलेल्या निर्बंधांमुळे रशियन तेल युरोपला कमी प्रमाणात जाऊ लागले. परिणामी, भारतीय कंपन्यांना हे तेल तुलनेने स्वस्तात मिळू लागले.9 / 10काही वर्षांत तेल आयातीत रशियाचा हिस्सा १ %वरून थेट ४०%पर्यंत पोहोचला. मात्र, ही आयात समुद्री कायद्याच्या कलम ९४चे उल्लंघन आहे. अपघात वा तेलगळती झाल्यास किनारपट्टीवरील देशांना पर्यावरणीय धोका निर्माण होतो. 10 / 10या खोटा झेंडा लावलेल्या जहाजांमधून आलेल्या तेलात भारताचा सर्वाधिक वाटा आहे. एकूण ३० जहाजे थेट भारतात आली आणि भारताने २.१ अब्ज युरो मूल्याचे तेल खरेदी केले. खोट्या झेंड्याखालील ही सर्वात मोठी आयात आहे.