३७ दिवसांनी परत गेले ब्रिटनचे एफ-३५बी लढाऊ विमान; भारताला फायदा झाला इतक्या लाखांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 17:30 IST2025-07-23T16:33:35+5:302025-07-23T17:30:37+5:30

ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट दुरुस्त करुन आपल्या घरी परतले आहे. मात्र याचा भारतालाही मोठा फायदा झाला.

१४ जून २०२५ च्या रात्री, भारताच्या दक्षिण टोकावरील इंडियन एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनच्या बाहेर एक अज्ञात विमान दिसले. ते ब्रिटनच्या रॉयल नेव्हीचे सर्वात प्रगत F-35B विमान होते जे विमानवाहू जहाज एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्सवरून चालवले जात होते. अचानक त्यात काही समस्या निर्माण झाली. यामुळे, जेटला प्रिन्स ऑफ वेल्सऐवजी केरळमधील तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले.

अनेक प्रयत्नांनंतरही हे जेट परत उड्डाण करू शकले नाही. अखेर, ३७ दिवसांची F-35 आपल्या घरी परतत आहे. पण जाताना हे जेट विमान ते बरेच मीम्स आणि ३७ दिवसांचे भाडे देऊन गेलं आहे.

१४ जूनच्या रात्री भारतीय हवाई दल त्यांच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टमद्वारे निरीक्षण करत होते. यावेळी हवाई दलाला रडारवर एक विमान दिसले. ते रॉयल नेव्हीचे F-35B विमान होते. त्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे F-35 चे आपत्कालीन लँडिंग केले. यासोबतच इंधन आणि सीआयएसएफ सुरक्षेसारखी सर्व प्रकारची मदत देखील करण्यात आली.

यानंतर १५ जून रोजी, भारतीय हवाई दलाने याबाबत माहिती दिली. त्याच दिवशी, प्रिन्स ऑफ वेल्सवर तैनात असलेले रॉयल नेव्ही तंत्रज्ञ भारतात आले आणि त्यांनी जेट दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. पुढील १० दिवस हे जेट भारतातच उभे राहिले.

२५ जून रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कबूल केले की जेट दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांचे त्यांच्या मदतीबद्दल आभारही मानले. या काळात, केरळच्या पावसाळ्यात हे जेट उघड्यावर उभे होते. भारतीय अधिकाऱ्यांनी अनेक वेळा जेट हँगरमध्ये नेण्याची ऑफर दिली. पण ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यावर सहमती दर्शवली नाही.F-35B हे एक प्रगत जेट असले तरी, त्याच्या बिघाडामुळे आणि ते लवकर दुरुस्त होत नसल्यान सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु झाली.

हे विमान एकूण ३७ दिवस तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे राहिले. विमानतळावर उभे राहण्यासाठी या जेटला दररोज २६ हजार २६१ रुपये भाडे द्यावे लागले. F-35 ला ९ लाख, ७१ हजार, ६५७ रुपये भाडे द्यावे लागले. हँगरच्या भाड्यासारखे काही अतिरिक्त शुल्क देखील F-35 ला द्यावे लागणार आहे. यासोबतच, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या हँगरचा शुल्क देखील भरावा लागेल, जिथे ते दुरुस्त करण्यात आले होते.