शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आयकर विभागाचा छापा, अधिकाऱ्यांना सापडलं मोठं घबाड

By महेश गलांडे | Published: October 27, 2020 11:39 AM

1 / 9
दिल्ली आयकर विभागाच्या पथकाने दिल्ली एनसीआर, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा येथील तब्बल 42 ठिकाणी छापा मारला. आयकर विभागाने या धाडीत मोठं घबाड हस्तगत केलं आहे.
2 / 9
विभागाच्यावतीने आत्तापर्यंत टाकलेल्या छाप्यात 2.37 रुपये रोकड आणि 2.89 कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे.
3 / 9
एंट्री ऑपरेटर संजय जैन आणि त्याच्या लाभार्थींच्या एकूण 42 ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली, त्यामध्ये मोठा माल विभागाला मिळाला आहे.
4 / 9
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही धाडसत्र सुरूच असून पैसे आणि ज्वेरली ताब्यात घेण्यात आली आहे.
5 / 9
तब्बल 42 ठिकाणांवर ही धाड टाकण्यात आली असून काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.
6 / 9
हैदराबामध्ये यापूर्वी आयकर विभागाने मोठी धाड टाकली होती, त्यावेळी एका महसूल अधिकाऱ्याकडून मोठी संपत्ती जप्त करण्यात आली होती
7 / 9
केंद्रीय आयकर विभागाने खोट्या बिलाच्या आधारे रोकड जमा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
8 / 9
विभागाने आपल्या कारवाई मोठ्या प्रमाणात रोकड आणि मौल्यवान वस्तू हस्तगत केल्या आहेत.
9 / 9
आयकर विभागाकडून अद्यापही छापेमारी सुरू असून आणखी घबाड मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयraidधाडPoliceपोलिसgoaगोवा