शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राष्ट्रपतींच्याहस्ते झालं ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 7:03 PM

1 / 5
नागपूर(कामठी) येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज करण्यात आले.
2 / 5
राष्ट्रपतींनी यावेळी विपश्यना सेंटरमधील बुद्ध मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानधारणा केली. कामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे 10 एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे.
3 / 5
या सेंटरमध्ये 83 फुट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे. या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फुट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहे. ओगावा सोसायटी तर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे.
4 / 5
राज्य शासनाने विपश्यना केंद्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी अर्थसहाय उपलब्ध करुन दिले आहे. या सेंटरमध्ये विपश्यना साधन शिबीर घेण्यात येणार आहे.
5 / 5
राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रामटेक येथे आले असता विद्यासागर महाराज यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी विद्यासागर राव , पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंदिराचे ट्रस्टी उपस्थित होते .