शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोफत रेशन हवे असेल तर, Mera Ration अ‍ॅप डाऊनलोड करा...; केंद्राचेच आहे, अनेकांना माहिती नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 6:31 PM

1 / 11
केंद्र सरकारकडून गरीबांना मोफत रेशनवरील धान्य दिले जाते. अनेक वर्षांपासूनची ही योजना आहे. परंतू आता ही योजना हायटेक होऊ लागली आहे. आता सामान्यांच्या हातातही मोबाईल आले आहेत. नवीन घेण्याची ताकद नसली तरी सेकंड हँड स्मार्टफोन लोकांनी घेतले आहेत. यामुळे मोफत रेशन हवे असेल तर केंद्र सरकारने देखील या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयारी केलेली आहे. 
2 / 11
भारत सरकारने रेशनचे धान्य वाटपामध्ये घोटाळा होऊ नये म्हणून, तसेच रेशन मिळविताना त्रास होऊ नये म्हणून एका अ‍ॅप बनविले आहे. या अ‍ॅपचे नाव Mera Ration आहे. ते तुमच्या मोबाईलमध्ये कसे डाऊनलोड करायचे, कसे वापरायचे हे तुम्हाला सांगणार आहोत. 
3 / 11
हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमची अनेक समस्यांपासून सुटका होणार आहे. रेशनवर रांगा लावा, धान्य संपल्याचे ऐका, आलेच नाही, कमी पाठविले अशी कारणे रेशन चालविणारे आजवर देत होते. यामुळे गरीबांना नाहक हेलपाटे मारावे लागत होते. आजही बऱ्याच ठिकाणी या गोष्टी होत आहेत.
4 / 11
मेरा रेशन अ‍ॅपद्वारे, नागरिकांना रेशन कार्डच्या योग्य स्थितीबद्दल माहिती मिळेल. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येते. शिधापत्रिकाधारकांनी पत्ता बदलल्यास त्यांना जवळचे रेशन दुकान कुठे आहे हे कळू शकणार आहे. 
5 / 11
आज अशी सोय आहे की लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही त्यांना रेशन घेऊ शकतात. याचबरोबर त्या रेशन दुकानात कोणत्या सेवा दिल्या जातात याची देखील माहिती मिळणार आहे. 
6 / 11
मेरा राशन अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे. तसेच लवकरच हे अ‍ॅप इतर भाषांमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
7 / 11
Google Play Store वरून मेरा राशन मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करता येईल. अ‍ॅप डाउनलोड करा. हे अ‍ॅप सेंट्रल एईपीडीएस टीमने तयार केले आहे.
8 / 11
अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरसह व्हेरिफिकेशन पूर्ण करावे लागेल.
9 / 11
फोन नंबरची नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला तुमचा रेशनकार्ड क्रमांक विचारला जाईल.
10 / 11
नंबर टाकल्यानंतर सबमिट करा आणि मग तुम्हाला रेशन कार्डशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
11 / 11
मेरा राशन अ‍ॅपवर रेशनच्या वितरणापासून गेल्या ६ महिन्यांतील व्यवहारांची माहिती पाहता येऊ शकते.