शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Heavy Rain : दिल्लीत 12 वर्षातील सर्वाधिक पाऊस, आनंद अन् माणूसकीही दिसली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 4:50 PM

1 / 12
देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असून देश या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे.
2 / 12
जोरदार पावसामुळे अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत सप्टेंबर महिन्यातील गेल्या 12 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला आहे.
3 / 12
दिल्लीतील पावसाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, अनेकजण पावसापासून आपले संरक्षण करताना दिसत आहेत, तर काहीजण या पावसाचा आनंद घेत आहेत.
4 / 12
दिल्लीच्या विविध भागात या मुसळधारा पावसामुळे पाणी साठले आहे. गेल्या 24 तासांत 112.1 मिमि पाऊस दिल्लीत पडला आहे.
5 / 12
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी दिल्लीत पावसाचा महिन्यातील 90 टक्के कोटा पूर्ण झाला आहे. सफदरजंग परिसरात सकाळी 8.30 वाजेपर्यंत 112.1 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
6 / 12
दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहनांसाठी नियमावली जाहीर केली असून पावसामुळे नागरिकांना अलर्टही जारी केला आहे.
7 / 12
दिल्लीच्या रस्त्यांवरही पाणीच पाणी दिसून येत आहे. रिक्षाचालक, सायकलचालक पाण्यांमधून मार्ग काढत आहेत
8 / 12
चारचाकी वाहनांनाही पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली आहे.
9 / 12
दिल्लीच्या पब्लीक ट्रान्सपोर्ट पकडताना दिल्लीकरांची मोठी दमछाक झाली, पावसाच्या पाण्यातून बस पकडताना प्रवासी दिसत आहेत
10 / 12
काही दिल्लीकरांनी या पावसाचा आनंद घेतला आहे, पावसाच्या पाण्यात पायांनी फुगा उडवताना या मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद आपलेही मन खुलवणारा ठरतो.
11 / 12
रात्रीच्या अंधारात दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रकाशाच्या सहाय्याने पावसाच्या संतत धारेत वाट शोधावी लागली
12 / 12
दिल्लीच्या पावसातही माणूसकीचे दर्शन घडले, रिक्षाचालकाच्या डोक्यावर छत्री ठेऊन पॅसेंजरने मनाचा मोठेपणा अन् मानवता जपली
टॅग्स :delhiदिल्लीRainपाऊसauto rickshawऑटो रिक्षाTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस