जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी; पर्यटकांसाठी आनंददायी वातावरण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 11:17 AM2019-11-07T11:17:35+5:302019-11-07T11:20:39+5:30

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्याच्या घोषणेनंतर बुधवारी डोंगराळ भागात या हंगामाची पहिली हिमवृष्टी झाली.

काश्मीर खोऱ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्गच्या उंच-उंच ठिकाणी सुमारे दोन फूट बर्फ पडला, तर टांगरी भागात 1.5 फूट बर्फ पडला

मंगळवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान हवामान अधिक खराब होईल आणि हिमवृष्टी होईल असा अंदाज होता. ताज्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे मैदानापासून डोंगरावर तापमानात तीव्र घट झाली आहे

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्ग येथे बुधवारी पहाटे हिमवृष्टी सुरू झाली. दरम्यान, गुलमर्गमध्ये आज सुमारे दीडशे पर्यटकांच्या आगमनानंतर पर्यटन व्यवसायाशी संबंधित लोकांचे चेहरे फुलले आहेत.

दरम्यान, खराब हवामानामुळे श्रीनगरमध्ये हायवे जाम आहे. अतिवृष्टीमुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर जम्मू आणि श्रीनगरमधील संपर्कही तुटला आहे.